७६ जागांसाठी ४३८१ अर्ज प्राप्त

By Admin | Updated: May 27, 2014 23:47 IST2014-05-27T23:47:01+5:302014-05-27T23:47:01+5:30

जिल्हा पोलीस दलात शिपाई पदाच्या ७६ जागांसाठी उमेदवारांना २५ मे पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. २५ च्या सायंकाळपर्यंत गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस भरतीसाठी ४ हजार ३८१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

Receive 4381 applications for 76 seats | ७६ जागांसाठी ४३८१ अर्ज प्राप्त

७६ जागांसाठी ४३८१ अर्ज प्राप्त

६ पासून शारीरिक चाचणी : पोलीस भरतीत पारदर्शकतेचे प्रयत्न

गोंदिया : जिल्हा पोलीस दलात शिपाई पदाच्या ७६ जागांसाठी उमेदवारांना २५ मे पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. २५ च्या सायंकाळपर्यंत गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस भरतीसाठी ४ हजार ३८१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. तरी देखील जिल्ह्यात पोलिसांची बरीच कमतरता आहे. गोंदिया जिल्हा पोलीस अधिक्षकांनी गोंदिया जिल्ह्यात आणखी ३८0 पोलीस शिपाई भरतीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव गृहविभागाला पाठविला. परंतु गृहमंत्रालयाने या ३८0 पैकी फक्त २३ जागा गोंदिया जिल्ह्यालाव देऊन पुन्हा गोंदिया जिल्ह्याशी सावत्रपणाची वागणूक केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सेवानवृत्त झालेल्या ५३ पोलीस कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त होत्या. त्या ५३ जागा व नविन मिळालेल्या २३ अश्या ७६ जागांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला ५ मेपासून सुरूवात करण्यात आली. ५ मे ते २५ मे या काळात पोलीस शिपाई पदासाठी अर्ज मागविण्यात आले. यात ३0९४ पुरूष तर १२८७ महिला असे एकूण ४ हजार ३८१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पोलीस भरती प्रक्रिया कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घेण्यात येणार आहे. यासाठी ६ जूनपासून पोलीस भरतीची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रीया चालणार आहे.

मागच्या वर्षीही मे व जून महिन्यात रखरखत्या उन्हात भरती घेण्यात आल्यामुळे शारीरिक चाचणीच्या वेळी अनेक मुली बेशुध्द झाल्या होत्या. भरतीत येणार्‍या तरूण, तरूणीच हाल झाले होते. यवर्षीही उन्हातच ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. परंतु उन्हाचे चटके उमेदवारांना बसू नये यासाठी पोलीस विभाग सकाळी व सायंकाळी या दोन वेळात शारीरिक चाचणी घेणार आहे.

मागच्या वर्षी ७२ जागेसाठी ८ हजारापेक्षा अधिक अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र यावर्षी भंडारा जिल्ह्यात अधिक जागा असल्याने गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश उमेदवारांनी गोंदिया जिल्ह्यात अर्ज दाखल केले आहे. सोबतच भारत बटालियनचीही भरती घेण्यात येत असल्यामुळे यंदा ७६ जागेसाठी ४ हजार ३८१ उमेदवारांनी अर्ज केले आहे.

या भरतीत आपली वर्णी लागावी यासाठी तरूण-तरूणीची शारीरिक कवायत जोमाने सुरू आहे. लांब उडी, गोळा फेक, पुलप्स, शंभर मीटर धावणे, पाच किलोमीटर धावणे हे कार्य तरूण तरूणी दररोज करीत आहेत. शिवाय या भरतीत आपण टॉपर राहावे यासाठी काहीनी क्लासेस लावल्या आहेत. तर काही सेल्फ स्टडी करीत आहेत. ६ जूनपासून उमेदवारांची शारीरिक चाचणीसाठी घेण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Receive 4381 applications for 76 seats