शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे महाव्यवस्थापक बॅनर्जी यांनी केली रेल्वे स्थानकाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक गौतम बॅनजी यांचे शुक्रवारी विशेष रेल्वे गाडीने गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले. या वेळी स्थानकावर त्यांचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वागत केले. बॅनर्जी हे त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा पोहचल्याने लोकप्रतिनिधी आणि संघटनेच्या पदाधिकाºयांना त्यांची गोंदिया रेल्वे स्थानकावर वाट पाहावी लागली. यावेळी रेल्वे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंदिया-बल्लारशा मार्गावरील पांढरी येथील मानवरहित चौकी बंद करण्याचा मुद्दा उपस्थित केला.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींनी मांडल्या समस्या : विविध संघटनाकडून निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक गौतम बॅनर्जी हे शुक्रवारी (दि.१७) गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी मुंडीकोटा, तिरोडा आणि गोंदिया रेल्वे स्थानकाची पाहणी करुन तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला. स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध संघटनाच्या प्रतिनिधीशीं चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक गौतम बॅनजी यांचे शुक्रवारी विशेष रेल्वे गाडीने गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले. या वेळी स्थानकावर त्यांचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वागत केले. बॅनर्जी हे त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा पोहचल्याने लोकप्रतिनिधी आणि संघटनेच्या पदाधिकाºयांना त्यांची गोंदिया रेल्वे स्थानकावर वाट पाहावी लागली. यावेळी रेल्वे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंदिया-बल्लारशा मार्गावरील पांढरी येथील मानवरहित चौकी बंद करण्याचा मुद्दा उपस्थित केला.या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामामुळे गावाचे दोन भागात विभाजन झाले असून त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे बाब निदर्शनास आणून दिली. ही समस्या मांडण्याकरिता पांढरी येथील गावकºयांचे शिष्टमंडळ देखील आले होते. महाव्यवस्थापक बॅनर्जी यांच्यासोबत मंडळ रेल्वे व्यवस्थापक शोभना बंडोपाध्याय, मंडळ वाणिज्य व्यवस्थापक व बिलासपूर झोनचे अधिकारी उपस्थित होते. गोंदिया रेल्वे स्थानक येथे स्टेशन मास्टर यांच्या कक्षात आ. विनोद अग्रवाल, आ.विजय रहांगडाले यांच्यासह विविध शिष्टमंडळानी महाव्यवस्थापक बॅनर्जी यांची भेट घेऊन समस्या मांडली. आ. अग्रवाल यांनी गोंदिया येथील रेल्वे तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे. अद्यापही सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरूवात झाली नसून ते केव्हा सुरू करणार असा सवाल उपस्थित केला. तसेच नागपूर-पुणे-नागपूर गरीबरथ या गाडीचा गोंदियापर्यंत विस्तार करण्यात यावा. गोंदिया ते शेगाव दरम्यान नवीन गाडी सुरू करण्यात यावी. गोंदिया डोंगरगड दरम्यान दुपारच्या वेळेत रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी महाव्यवस्थापक बॅनर्जी यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी सर्व समस्या ऐकूण घेत यावर तोडगा काढून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यानंतर त्यांनी गोंदिया रेल्वे स्थानकाचे निरीक्षण केले. डेमू शेड आणि सर्विस इमारत व नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात बॅनर्जी यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वे