शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

महागाईविरूद्ध मोर्चातून आक्रोश

By admin | Updated: July 7, 2014 23:39 IST

ग्रामीण शेतकरी शेतमजूर वनहक्कदार, रेशनकार्ड, वृद्ध पेन्शनधारक यांच्या मागणीला घेऊन आणि वाढत्या महागाईच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन,

गोरेगाव : ग्रामीण शेतकरी शेतमजूर वनहक्कदार, रेशनकार्ड, वृद्ध पेन्शनधारक यांच्या मागणीला घेऊन आणि वाढत्या महागाईच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन, महाराष्ट्र राज्य किसान सभा यांच्याद्वारे पंचायत समिती व तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चेद्वारे खंडविकास अधिकारी पुराम आणि तहसीलदार सपाटे यांना निवेदन देण्यात आले. वाढती महागाई कमी करा, नफाखोर व्यापाऱ्यांवर कारवाई करा, पेट्रोल, डिझेल, रेल्वे भाडे कमी करा, निवडणुकीतील वचने पाळा, वनहक्क जमिनीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढून जमिनीचे पट्टे वाटप करा, शेतकरी शेतमजूरांना ६० वर्षात ३ हजार रुपये पेन्शान लागू करा, नवे व जुने रेशन कार्ड त्वरीत बनवून देण्यात यावे, ४५ किलो धान्य देण्यात यावे, श्रावणबाळ योजनेचे मानधन वेळेवर वाटप करा, वन विभागाद्वारे वनहक्के जमिनीचे जीपीएस करण्यात यावे, पंचायत समितीद्वारे घरकुलधारकांना प्रथम किस्त व अंतिम किस्त घर कामासाठी त्वरीत देण्यात यावी, रोजगार हमीच्या कामाचे पगार द्यावे, कृषी औजारे सरळ शेतकऱ्यांना देण्यात यावे, पं.स. सदस्य कोटा बंद करावा आदी मागण्यांचे निवेदन पं.स. आणि तहसील कार्यालयात देण्यात आले.
बस स्थानक चौकातून निघालेला हा मोर्चा गोरेगाव तहसील कार्यालयावर व पंचायत समिती कार्यालयावर नेण्यात आला. यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. प्रतिनिधी मंडळात कॉ.हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, नारायण भलावी, चरणदास भावे, भय्यालाल कटरे, दुलीचंद कावडे, टेकचंद काबरकर, माधोजी मेश्राम, चैतराम दियेवार, गुलाब शहरे, सुरेश बिसेन, राया मारगाये, गया क्षीरसागर, सुनीता वैद्य, इंद्रराज वाघमारे, बेनिराम नंदेश्वर यांचा समावेश आहे.
पंचायत समिती आणि तहसील कचेरीसमोर मोर्च्याला रहांगडाले, गणविर, भलावी, भावे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. नागरिकांची मागणी पुर्ण होइपर्यंत संघर्ष चालुच राहील असेही यावेळी सांगण्यात आले.