आठवडाभरात ३५ कोटी रुपयांची धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:00 AM2020-12-02T05:00:00+5:302020-12-02T05:00:14+5:30

खरीप हंगामातील धान खरेदीला दिवाळीनंतर वेग आला आहे. यंदा खरीप हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ७० धान खरेदी केंद्राचे नियोजन केले आहे. तर सध्या ६१ धान खरेदी केंद्र सुरु झाले आहे. शासनाने यंदा धानाला प्रती क्विंटल १८६८ ते १८८८ रुपये हमीभाव आणि ७०० रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. तर बाहेर ऐवढा दर मिळत नसल्याने शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी गर्दी करीत आहे.

Purchase of paddy worth Rs 35 crore in a week | आठवडाभरात ३५ कोटी रुपयांची धान खरेदी

आठवडाभरात ३५ कोटी रुपयांची धान खरेदी

Next
ठळक मुद्दे६१ धान खरेदी केंद्र सुरु : नवीन धान खरेदी केंद्राची प्रतीक्षा, बैठकीनंतरच मान्यता

  लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  दिवाळीनंतर जिल्ह्यात धान खरेदी केंद्रावरील धानाची आवक वाढली आहे. मागील आठ दिवसांच्या कालावधीत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या ६१ धान खरेदी केंद्रावरुन ३५ कोटी ३७ लाख रुपयांची धान खरेदी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही पूर्ण धान खरेदी केंद्र सुरु झाल्याने काही भागात शेतकऱ्यांची समस्या कायम आहे. 
खरीप हंगामातील धान खरेदीला दिवाळीनंतर वेग आला आहे. यंदा खरीप हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ७० धान खरेदी केंद्राचे नियोजन केले आहे. तर सध्या ६१ धान खरेदी केंद्र सुरु झाले आहे. शासनाने यंदा धानाला प्रती क्विंटल १८६८ ते १८८८ रुपये हमीभाव आणि ७०० रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. तर बाहेर ऐवढा दर मिळत नसल्याने शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी गर्दी करीत आहे. सध्या हलक्या धानाची कापणी आणि मळणी पूर्ण झाली असल्याने याच धानाची विक्री करीत आहे. मात्र आता जड धानाच्या कापणीाला सुध्दा सुरुवात झाली असून हा धान देखील पंधरा दिवसात बाजारपेठेत विक्रीस येण्याची शक्यता आहे. 
त्यामुळे धान खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढण्याची शक्यता आहे. मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत १ लाख ३५ हजार क्विंटल धान खरेदी केली असून खरेदी केलेल्या धानाची किमत ३५ कोटी ३७ लाख रुपये आहे. उर्वरित ९ धान खरेदी केंद्र अद्यापही सुरु झाले नसल्याने काही भागातील शेतकऱ्यांची कोंडी अद्यापही कायम आहे. 
नवीन धान केंद्रांना मंजुरीची प्रतीक्षा 
धान खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची दूरवर पायपीट कमी करण्यासाठी यंदा धान खरेदी केंद्राची संख्या वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जळपास ३० ते ३५ धान खरेदी केंद्र वाढण्याची शक्यता असून यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीची मंजुरी मिळताच हे धान खरेदी केंद्र सुरु केले जाणार असल्याची माहिती आहे. 
महामंडळाने खरेदी केला २२ हजार क्विंटल धान 
आदिवासी विकास महामंडळातंर्गत आतापर्यंत ४४ पैकी केवळ १३ धान खरेदी केंद्र सुरु झाले असून या धान खरेदी केंद्रावरुन आतापर्यंत २२ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. महामंडळाची २४ हून अधिक धान खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने आदिवासी भागातील शेतकऱ्यांना अद्यापही खासगी व्यापाऱ्याच्या दारात जावे लागत आहे. 
 

 

Web Title: Purchase of paddy worth Rs 35 crore in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.