शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुजारीटोला व कालिसराड रिकामे

By admin | Updated: July 6, 2014 23:58 IST

जिल्ह्यातील प्रकल्पांसह जुन्या मालगुजारी तलावांतून वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो. यंदा मात्र पावसाअभावी जिल्ह्यातील हे प्रकल्प कोरडे पडत चालले आहे. तर जुन्या मालगुजारी

पाणी पेटणार : अन्य प्रकल्पांतही नाममात्र जलसाठा
गोंदिया : जिल्ह्यातील प्रकल्पांसह जुन्या मालगुजारी तलावांतून वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो. यंदा मात्र पावसाअभावी जिल्ह्यातील हे प्रकल्प कोरडे पडत चालले आहे. तर जुन्या मालगुजारी तलावांचीसुद्धा हीच गत आहे. विशेष म्हणजे पाण्याचे प्रमुख स्त्रोत असलेले पुजारीटोला व कालिसराड हे दोन मोठे प्रकल्प आताच रिकामे झाले आहे. दुष्काळाच्या स्थितीत आता प्रकल्प आटत चालल्याने पाणी पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
जिल्ह्याची तलावांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. शिवाय चार मोठे व १० मध्यम, २० लघु प्रकल्प व ३८ जुने मालगुजारी तलाव जिल्ह्याला लाभलेले आहेत. या जलस्त्रोतांच्या माध्यमातूनच जिल्हावासीयांची शेती व गळ््याची तहान भागते. मात्र निसर्गाच्या तडाख्यापुढे यंदा जिल्ह्याला वरदान ठरलेले हे जलस्त्रोत यंदा हतबल ठरत आहेत. त्याचे असे की, जून महिना लोटला असून जुलै सुरू झाला आहे. मात्र अद्याप एक-दोन वेळा पडलेल्या पावसाच्या शिंतोड्यांखेरीज खरा पाऊस बरसलेला नाही. यामुळे जिल्ह्याला पाणी पुरविणारे जलस्त्रोत आटू लागले आहेत.
या प्रकल्पांची आजची स्थिती बघितल्यास येणाऱ्या काही दिवसांनंतरचे भयावह वास्तव डोळ््या पुढे उभे राहते. यात जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांतील पुजारीटोला व कालिसराड हे प्रकल्प आता कोरडे पडले आहेत. सिरपूर प्रकल्पात २६.५९ टक्के व इटियाडोह प्र्रकल्पात १८.७६ टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांकडे बघता, बोदलकसा १४.५४ टक्के, चोरखमारा १८.३३ टक्के, चुलबंद २५.१८ टक्के, खैरबंधा १३.०३ टक्के, मानागड ७.८७ टक्के, रेंगेपार १६.१६ टक्के, संग्रामपूर ९.२१ टक्के, उमरझरी १५.७६ टक्के, कटंगी १६.८१ टक्के तर कलपाथरी ल.पा.खाली गेल्याची नोंद आहे.
लघु प्रकल्पांत, आक्टीटोला ९.५७ टक्के, भदभद्या १७.६१ टक्के, डोंगरगाव ५.२७ टक्के, गुमडोह २.९४ टक्के, हरी १५.७५ टक्के, कालीमाती ४.१९ टक्के, मोगरा ३८.५९ टक्के, नवेगावबांध ९.३० टक्के, पिपरीया ५.७४ टक्के, पांगडी ०.५६ टक्के, रेहाडी ३.३० टक्के, राजोली ११.७२ टक्के, रिसाला ६.८१ टक्के, सडेपार ३१.४० टक्के, सेरपार २०.०७ टक्के, वडेगाव ७.५६ टक्के, ओवारा ३२.१९ टक्के पाणीसाठी आहे. सोनेगाव, सालेगाव व जुनेवानी लघु प्रकल्प ल.पा.खाली गेल्याची नोंद आहे. शिवाय जुन्या मालगुजारी तलावांची स्थिती अत्यंत भयावह आहे. ३८ तलावांपैकी १९ तलाव ल.पा.खाली गेल्याची नोंद आहे. तर फुलचूर तलावात ४५.३२ टक्के, खैरी १.९५ टक्के, खमारी २०.९० टक्के, काटी १.९३ टक्के, कोसमतोंडी ११.५५ टक्के, कोकना १४.४५ टक्के, खोडशिवनी ८.२२ टक्के, खाडीपार १.५७ टक्के, मालीदुंगा ३४.७७ टक्के, मेंढा १.७० टक्के, मोरगाव २.२२ टक्के, माहुरकू डा ५८.१० टक्के, निमगाव ११.८९ टक्के, पळसगाव डव्वा २.९४ टक्के, पुतळी ५०.८२ टक्के, सौंदड २०.९७ टक्के एवढाच पाणीसाठी शिल्लक आहे. जिल्ह्यातील जलस्त्रोतांची ही स्थिती बघता पाऊस न बरसल्यास या प्रकल्पसुद्धा आटून पाणी पेटण्याची स्पष्ट चिन्हे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)