शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोविड ड्युटीतील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता व वेतनवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:01 IST

कोविड ड्यूटी केलेल्या शिक्षकांना बदली रजा मंजूर करून त्याची सेवा पुस्तिकेत नोंद घ्यावी, कोविड ड्यूटी करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता व विशेष वेतनवाढ लागू करावी, कोविड ड्यूटीवर मरण पावलेल्या शिक्षक-शिक्षकेतरांना ५० लाखांची मदत तातडीने द्यावी, कोरोनाची लागण झाल्यामुळे झालेल्या उपचाराचा खर्च तातडीने द्यावा, या कालावधीत काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करून त्यांचा वापर ऑनलाइन शिक्षणात करावा, ....

ठळक मुद्देशिक्षक भारती संघटना : उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोविड ड्यूटीतील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता व वेतनवाढ द्या यासह अन्य मागण्यांना घेऊन शिक्षक भारती संघटनेने शनिवारी एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन केले. यांतर्गत, संघटनेच्यावतीने उपजिल्हााधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात, कोविड ड्यूटी केलेल्या शिक्षकांना बदली रजा मंजूर करून त्याची सेवा पुस्तिकेत नोंद घ्यावी, कोविड ड्यूटी करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता व विशेष वेतनवाढ लागू करावी, कोविड ड्यूटीवर मरण पावलेल्या शिक्षक-शिक्षकेतरांना ५० लाखांची मदत तातडीने द्यावी, कोरोनाची लागण झाल्यामुळे झालेल्या उपचाराचा खर्च तातडीने द्यावा, या कालावधीत काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करून त्यांचा वापर ऑनलाइन शिक्षणात करावा, ऑनलाईन शिक्षणात मोबाइलऐवजी टेलिव्हिजनचा वापर सुरु करावा, ऑनलाइन शिक्षण प्रभावीपणे देण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची साधने उपलब्ध करून द्यावीत (टॅबलेट, अ‍ॅड्रॉईड फोन), शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर न टाकता त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासनावर द्यावी, शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांचे सॅनिटायझेशन करावे, शाळांना थर्मल स्कॅनिंग मशीन, सॅनिटायझर, मास्क हॅण्डग्लोज इत्यादी सर्व साहित्य उपलब्ध करून द्यावे, कोरोना काळात विद्यार्थ्यांना वर्कबुक व अ‍ॅक्टिव्हिटी बुक द्यावे, कोरोनामुळे स्थलांतरित गरीब, दलित, मागासवर्गीय व भटक्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील शाळेत विनाअट प्रवेश द्यावा, कोरोना काळात अनुदान, पगार, महागाई भत्ते इत्यादींमध्ये कपात करू नये, मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेतील उपस्थिती शाळा सुरू होईपर्यंत बंधनकारक करू नये, ५५ वर्षे वयावरील आश्रमशाळा कर्मचाºयांना शाळेत बोलविण्यात येऊ नये आदी मागण्यांचा समावेश आहे.या मागण्यांचे निवेदन शिक्षक भारती संघटनेच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश खवले, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुनील मांढरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे यांना दिले.शिष्टमंडळात शिक्षक भारती माध्यमिक विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, विभागीय अध्यक्ष प्राथमिक प्रकाश ब्राम्हणकर, शिक्षक भारती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व्ही. डी. मेश्राम, माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवाने, प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरडे, अनिल मंत्री, पालांदुरकर, कार्यवाह टी.एस.गौतम, बी. एम. कोसरकर, पी.डी.चव्हाण, संतोष डोंगरे, संतोष बारेवार, राजु टेंभरे, संतोष मेंढे, श्याम बावने, दिलीप रहांगडाले, असीम बनर्जी, एस.बी.मेंढे, ए.टी.डुंभरे उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षकcorona virusकोरोना वायरस बातम्या