शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

खासगी हॉस्पिटलमध्ये ५० टक्के बेड कोरोना रूग्णांसाठी राखीव ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST

नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील खासगी रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड राखीव केले. तसेच हॉस्पिटलला पत्र देऊन रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. याच पार्श्वभुमीवर गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेवून शहरातील ५ खासगी रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५० बेड राखीव ठेवण्याचे निर्देश द्यावे.

ठळक मुद्देनागपूरात शक्य मग गोंदियात का नाही : अभय सावंत यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शासकीय रूग्णालयातील व्यवस्था सुद्धा अपुरी पडत आहे. तेथील सोयी सुविधांच्या अभावामुळे रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नागपूरच्या धर्तीवर गोंदिया येथील किमान ५ खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी ५० बेड राखीव ठेवण्यात यावे अशी मागणी भाजयुमोचे माजी माजी जिल्हाध्यक्ष अभय सावंत यांनी केली आहे.नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील खासगी रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड राखीव केले. तसेच हॉस्पिटलला पत्र देऊन रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. याच पार्श्वभुमीवर गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेवून शहरातील ५ खासगी रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५० बेड राखीव ठेवण्याचे निर्देश द्यावे. यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यास मदत होईल. येथील शासकीय रुग्णालयातील आणि कोविड केअर सेंटरमधील अनागोंदी कारभार दररोज पुढे येत आहे. रुग्णालयातील अवस्थेमुळे तिथे जाण्याची कुणीही हिम्मत करणार नाही. एखाद्या लोकप्रतिनिधीला कोरोनाची लागण झाली तर ते सुद्धा शासकीय रुग्णालयात दाखल होणार नाही अशी बिकट अवस्था या रुग्णालयांची झाली आहे. बरेच कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण केले जात आहे. शासकीय रुग्णालयात एखाद्या ह्दय रुग्णाला ज्याची एन्जीयोप्लास्टी झालेली आहे किंवा मधूमेह आणि उच्च रक्तदाब आहे. तसेच त्याला इतर आजार पण आहेत त्यांच्यासाठी किती स्पेशलिस्ट डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यांची रक्त चाचणी तिथे केली जाते का, त्यांच्या किडनी व मधुमेह, रक्तवाहिन्या संबंधित त्यांच्या टेस्ट केल्या जातात का? जात असतील तर तिथे कोणत्या-कोणत्या प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत का याबाबत शंका आहे.त्यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नागपूरच्या पार्श्वभूमिवर येथील किमान ५ खासगी हॉस्पीटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५० बेड आरक्षित ठेवण्यात यावे. यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी सुध्दा पुढाकार घेण्याची गरज असल्याची सावंत यांची मागणी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल