नऊ दारू अड्ड्यांवर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST2021-07-05T04:18:26+5:302021-07-05T04:18:26+5:30

तिरोडा : तिरोडा पोलिसांनी अवैध दारूभट्टयांवर धाडसत्र राबवून दारूसाठा व ८ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

Police raid nine liquor dens | नऊ दारू अड्ड्यांवर पोलिसांची धाड

नऊ दारू अड्ड्यांवर पोलिसांची धाड

तिरोडा : तिरोडा पोलिसांनी अवैध दारूभट्टयांवर धाडसत्र राबवून दारूसाठा व ८ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. ४) सकाळी तिरोडा परिसरात करण्यात आली.

तिरोडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी तिरोडा परिसरात एकूण नऊ ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू भट्ट्‌यांवर धाडी टाकल्या. यात संत रविवास वॉर्ड येथील सुरज प्रकाश बरेकर यांच्या घरझडतीत १९० प्लास्टिक चुंगडीत ७६०० किलो मोहफूल सडवा, २ ड्रम असा एकूण ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल, तर शामराव श्रीराम झाडे यांच्या घरझडतीत १६८० किलो मोहफुल सडवा, १० लिटर दारू असा एकूण १३ हजार रुपयांचा मुद्देमाल, भूपेंद्र माणिक बरेकर यांच्या घरझडतीत १०२० किलो सडवा मोहफूल, चंद्राशिला श्रावण कनोजे यांच्या घरझडतीत ३० प्लास्टिक चुंगडीत ६०० किलो सडवा, सुखदेव अंतू जांभुळकर यांच्या घरझडतीत ६० लिटर मोहा दारू, सुरेश अंतू जांभुळकर रा. काचेवानी यांच्या घरझडतीत ५० लिटर दारू, तांबेस्वर आशाराम तुमसरे रा. लाखेगाव यांच्या घरझडतीत १८ लिटर मोहा दारू, नरेंद्र निताराम सुरवंशी रा. मेंढा यांच्या घरझडतीत २० लिटर मोहा दारू असा एकूण ८ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उपविभागीय अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सपोनि ईश्वर हनवते, अभिजित जोगदंड, पोउपनि अशोक केंद्रे, महिला पोउपनि राधा लाटे यांनी केली.

040721\img-20210704-wa0018.jpg

पकडलेल्या मुद्देमालासह पोलीस निरीक्षक पारधी व अन्य

Web Title: Police raid nine liquor dens