शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

विस्तार अधिकाऱ्यासह पोलीस शिपाई जाळ्यात

By admin | Updated: July 9, 2014 23:35 IST

तलाव लीजवर देण्यासाठी लाच मागणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला आणि बहिणीवर कारवाई न करता जप्त दुचाकी सोडून देण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस शिपायावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या

लाचखोरांवर लगाम : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
गोंदिया : तलाव लीजवर देण्यासाठी लाच मागणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला आणि बहिणीवर कारवाई न करता जप्त दुचाकी सोडून देण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस शिपायावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. यातील विस्तार अधिकाऱ्यावर भंडारा येथील पथकाने तर पोलीस शिपायावर गोंदियातील एसीबीच्या पथकाने बुधवारी कारवाई केली.
सविस्तर असे की, बलमाटोला येथील रहिवासी असलेल्या एका शेतकऱ्यावर आणि त्यांच्या बहिणीवर २१ जून रोजी दवनीवाडा पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच यात त्या शेतकऱ्याला अटक करण्यात आली. तसेच त्यांची दुचाकीसुद्धा जप्त करण्यात आली होती. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगून बहिणीला अटक न करण्यासाठी आणि जप्त केलेली दुचाकी सोडूून देण्याकरिता पोलीस शिपाई महीपालसिंह भुवनसिंह सोलंकी (ब.क्र.२०२१) याने त्या शेतकऱ्याला १० हजार रूपयांची मागणी केली. यावर फिर्यादीने ३० जून रोजी याबाबत गोंदियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
त्या तक्रारीच्या आधारे पथकाने गुरूवारी (दि.१०) सापळा लावला, मात्र फिर्यादीच्या वागणुकीवरून आरोपीला संशय आल्याने त्याने पैसे स्वीकारण्याचे टाळले. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सांगून लाचेची मागणी केल्याप्रकरणी आरोपी पोलीस शिपाई सोलंकीवर दवनीवाडा येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत, फिर्यादी कृष्णकुमार हरपाल बरमुंशी (३९, रा.कवलेवाडा) हे मस्त्यव्यवसाय संस्थेचे अध्यक्ष असून त्यांनी कवलेवाडा येथील तलाव पाच वर्षांकरिता लीजवर घेण्यासाठी २ जुलै रोजी अर्ज केला होता. सात हजार २०० रूपये या ठराविक रकमेतील दोन हजार ६०० रूपये त्यांनी त्याच दिवशी भरले. भरलेल्या पैशांची पावती मागून तलावात शिंगाडे लावायचे काय याबाबत त्यांनी आरोपी पंचायत समिती विस्तार अधिकारी महेंद्र शंकर उके (४९) यांना विचारले. त्यासाठी उके यांनी एक हजार रूपयांची मागणी केली. यावर बरमुंशी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या भंडारा पथकाकडे तक्रार दिली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी उके यांना फिर्यादीकडून लाच घेताना रंगेहात पकडले.
(शहर प्रतिनिधी)