शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडली

By admin | Updated: December 20, 2014 01:46 IST

येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात गुंडाचा प्रवेश व त्यांच्याकडून होत असलेला अतिरेक ही काही नवी बाब नाही.

गोंदिया : येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात गुंडाचा प्रवेश व त्यांच्याकडून होत असलेला अतिरेक ही काही नवी बाब नाही. याचीच प्रचिती आणखी एका घटनेतून आली जेव्हा काही तरूणांनी ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडली. १८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजतादरम्यान ही घटना घडली. शिवाय रूग्णालयात आलेल्या रूग्णांचे पाकीटही मारण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, १८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता दरम्यान काही तरूण रूग्णालयात एका रूग्णाला बघण्यास आले होते. परत जाताना या तरूणांनी आपली मोटारसायकल एका रूग्णवाहीकेपुढे उभी ठेवली. या रूग्णवाहीकेतून एका रूग्णाला हलविले जाणार होते मात्र हे तरूण मोटारसायकल हटविण्यास राजी नव्हते.
यावर ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचारी बालू उद्धव सानप (३१) याने त्या तरूणांना मोटारसायकल हटविण्यास सांगीतले. मात्रत्या तरूणांनी रागाच्या भरात सानप यांचा कॉलर पकडून त्यांनी धमकी दिली व निघून गेले.
या प्रकरणी शहर पोलिसांनी भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३५२, ५०४, ५०६ अंतर्गत प्रकरण नोंद केले आहे. सांगीतले जाते की, या तरूणांत कृष्णपुरा वॉर्ड निवासी खुशाल सतदेवे, विक्की भोयर, संजय गजभिये, अमर गजभिये व इतर तीन-चार तरूणांचा समावेश आहे. यातील काही तरूण गुन्ह्यांत लिप्त असून एकाला आजन्म कारावासाची शिक्षा झाली असून तो सध्या सुटीवर बाहेर आल्याचीही माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)
अनेकांची पाकिटे मारली
ही घटना घडते न घडते तोच रूग्णालयात तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे निर्मल रामअवतार अग्रवाल (३१,रा.गणेशनगर) यांना धक्का देत त्यांच्या खिशातून एकाने पाकीट मारला व साथीदाराला दिला. १९ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता दरम्यान घडलेल्या या घटनेत पाकीट मारणाऱ्याचा साथीदार तर पळून गेला मात्र निर्मल यांनी पाकीट काढणाऱ्यास पकडून घेतले. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून हे कृत्य करणारे जय करियार व आकाश टेंभेकर (रा.गौतमनगर) हे तरूण आहेत. तेथे उपस्थित असलेल्यांनी सांगीतले की, या दोघांनी आणखीही काहींचे पाकीट मारले असून रूग्णालयात ते सतत वावरत असतात. पोलिसांनी भादंविच्या कलम ३९२,३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.