शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

लोकसेवा करणाऱ्या व्यक्ती घडविणे गरजेचे

By admin | Updated: February 28, 2015 01:07 IST

प्रत्येक व्यक्ती स्व:हिताकरिता जीवन जगतो. त्यामुळे सामाजिक सेवेची भावना दुरावत चालली आहे. नागरिकांच्या प्रश्नांना शोधून त्यांचे निराकरण करणाऱ्यांची आज गरज आहे.

आमगाव : प्रत्येक व्यक्ती स्व:हिताकरिता जीवन जगतो. त्यामुळे सामाजिक सेवेची भावना दुरावत चालली आहे. नागरिकांच्या प्रश्नांना शोधून त्यांचे निराकरण करणाऱ्यांची आज गरज आहे. याकरिता प्रत्येक कुटुंबात लोकसेवा करणारी व्यक्ती घडविण्याची आवश्यकता आहे, असे मत आ. संजय पुराम यांनी व्यक्त केले.बनगाव ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायत भवनात आरोग्य शिबिर व सत्कार कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून माजी आ. भेरसिंग नागपुरे, माजी आ. केशवराव मानकर, पं.स. सभापती हनुवंत वट्टी, उपसभापती जयकृष्ण रहांगडाले, पोलीस निरीक्षक बी.डी. मडावी, सरपंच सुषमा भुजाडे, भाजयुमो तालुका अध्यक्ष जयप्रकाश शिवणकर, यशवंत मानकर, उपसरपंच पृथ्वीपाल सोमवंशी उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आले.या वेळी आ. संजय पुराम यांनी पुढे विकासाच्या दृष्टीने प्रत्येक गावे परिपूर्ण करण्याकरिता शासनाच्या योजनांची पूर्तता करण्याचे आवाहन केले. ग्रामीण परिसरही शहराप्रमाणे विकासाच्या गतीत पुढे व्हावे, यासाठी योजना व निधीचा योग्य वापर होईल या दिशेने आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांनी विकास कामांना गती देण्याकरिता सर्व पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतींना, नागरिकांना मुलभूत सोई देण्याकरिता कामे करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी ग्रामपंचायतच्या वतीने आ. संजय पुराम व पोलीस निरीक्षक यांनी विकासात्मक कार्यांना गती मिळवून दिल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले. यानंतर आरोग्य शिबिरात जवळपास ३०० रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. शिबिरात तज्ञ आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णांवर औषधोपचार केलेप्रास्ताविक सरपंच सुषमा भुजाडे, संचालन विरेंद्र अंजनकर यांनी तर आभार उपसरपंच पृथ्वीपाल सोमवंशी यांनी मानले. शिबिरात ज्येष्ठ नागरिक सुखराम फुंडे, ग्रामपंचायत सदस्य मनोज चव्हाण, प्रकाश शिवणकर, प्रमोद शिवणकर, नितीन भसे, दुर्गा चुटे, भारती असाटी, शारदा फुंडे, किरण नागभिडे, सुषमा उईके, आमगावचे सरपंच पद्मा चुटे, क्रिष्णा चुटे, कमलेश चुटे, घनश्याम अग्रवाल, नर्मदा चुटे व ग्रामविकास अधिकारी पी.सी. मेश्राम उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)