शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा होणार

By admin | Updated: December 31, 2014 23:25 IST

मेडिकल कॉन्सिल आॅफ इंडियाची एक चमू २९ डिसेंबरला गोंदियात आली. या चमूच्या सदस्यांनी सविस्तर तपासणी व निरीक्षण केले. आता ही चमू आपला अहवाल केंद्रीय शासनाकडे सोपविणार आहे.

गोंदिया : मेडिकल कॉन्सिल आॅफ इंडियाची एक चमू २९ डिसेंबरला गोंदियात आली. या चमूच्या सदस्यांनी सविस्तर तपासणी व निरीक्षण केले. आता ही चमू आपला अहवाल केंद्रीय शासनाकडे सोपविणार आहे. याच आधारावर गोंदियात मेडिकल कॉलेज सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.गोंदियात आलेल्या मेडिकल काँशिल आॅफ इंडियाचे नेतृत्व आसामच्या डॉ. बोस व डॉ. नागेश्वर राव यांनी केले. अचानक ही चमू गोंदियात पोहचली. गोंदिया मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. केवलिया त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. या चमूने केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचे निरीक्षण केले. केटीएस रूग्णालयाची ओपीडी, आकस्मिक विभाग, आॅपरेशन थिएटर, रूग्णांना भरती करण्याची व्यवस्था, मृतदेहांच्या उत्तरीय तपासणीची व्यवस्था पाहिली. केटीएस रूग्णालयाच्या समोरील उघड्या जागेचे निरीक्षण केले. एवढेच नव्हे तर पाणी, जनरेटरची व्यवस्था आहे किंवा नाही, इतर काय-काय व्यवस्था आहेत याची माहिती जाणूण घेतली. केटीएस रूग्णालयाचा नकाशासुद्धा बघितला. यानंतर ही चमू बाई गंगाबाई महिला रूग्णालयात गेली. तिथे ब्लड बँकेचे निरीक्षण केले. आॅपरेशन थिएटर, ओपीडी बघितली. किती वार्ड आहेत, खाटांची किती व्यवस्था आहे, किती रूग्ण येतात ही सर्व माहिती मिळवून घेतली. बाई गंगाबाई महिला रूग्णालयात तयार झालेले नवीन भवन जिथे नर्सिंग प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे, त्या संपूर्ण भवनाचे निरीक्षण केले. शेवटी ही चमू कुडवा येथील मेडिकल कॉलेजसाठी प्रस्तावित जागेचे निरीक्षण करण्यासाठी पोहचली. तेथील समस्यांच्या बाबत चमूच्या सदस्यांनी माहिती मिळवून घेतली. मेडिकल कॉलेज बांधकामाचे शासकीय जीआरवर नजर घातली. जनिणीचा नकाशासुद्धा बघितला. तिथून परतल्यावर केटीएस रूग्णालयात रात्री ८.३० वाजतापर्यंत बैठक झाली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दोन्ही रूग्णालयात काय व्यवस्था आहेत, कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे, किती रूग्ण येतात यावर चर्चा झाली. ही व्यवस्था मेडिकल कॉलेजच्या बांधकामासाठी किती सार्थक ठरेल, याबाबत काही अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सदर चमू आपला अहवाल आता केंद्र शासनाकडे सोपविणार आहे. शक्यतो केंद्र शासनाकडून मेडिकल काँशिल आॅफ इंडिया याबाबत रिपोर्ट पाठविण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)