शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमय गोंदिया

By admin | Updated: June 13, 2014 00:16 IST

शहरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी गटारावरील झाकणं उघडी आहेत. आता पावसाळ्यात रस्त्यावर पाणी भरून खड्डे बुजतील. अशावेळी अनेक जण वाहनांसह या खड्ड्यात पडल्याशिवाय

प्रशासनाची डोळेझाक : नागरिकांचा जीव धोक्यात
कपिल केकत/देवानंद शहारे - गोंदिया
शहरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी गटारावरील झाकणं उघडी आहेत. आता पावसाळ्यात रस्त्यावर पाणी भरून खड्डे बुजतील. अशावेळी अनेक जण वाहनांसह या खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही.


विशेष म्हणजे मृगाला सुरूवात झाली असून कधीही पाऊस बरसण्याची चिन्हे आहेत. एखाद्या वेळी जोरदार आला तर शहरातील हे खड्डे पावसाच्या पाण्याने भरून जातील. त्यात रस्त्यावरून जाणाऱ्यांना हे खड्डे दिसणार नाहीत व अशात खड्ड्यात वाहन शिरले तर मोठा अपघात होऊ शकतो. न.प.प्रशासनाने देखील या खड्ड्यांपासून निर्माण होणारा धोका लक्षात घेत पावसाळ््यापूर्वी त्यांची दुरूस्ती करण्याची तसदी घेतली नाही. यामुळे शहरात उघड्यावर पडलेले हे खड्डे शहरवासीयांसाठी धोकादायक ठरणार यात शंका नाही.


रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्या तयार करण्यात आल्या आहेत. रस्त्यांच्या मधातून गेलेल्या नाल्यांच्या सफाईसाठी खड्डे (आऊटलेट) ठेवण्यात आले आहेत. मात्र या खड्ड्यांवर झाकणं लावण्यात आले नसल्याने या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्याचे शहरवासीय सांगताहेत. अशात या खड्ड्यांवर झाकण लावणे गरजेचे आहे. मात्र पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणाने त्यावर झाकण लावण्यात आले नाहीत व त्याचा भुर्दंड मात्र शहरवासीयांना सोसावा लागत आहे.

नाल्यांच्या सफाईच्या दृष्टीने हे खड्डे ठेवण्यात आले असले तरी यामध्येच कचरा टाकला जात असल्याचे चित्र शहरात बघावयास मिळते. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी अद्याप नाल्यांची सफाई झालेली नाही. यामुळे पावसाचे पाणी नाल्यांत साचून रस्ते पाण्याखाली जात असल्याचे नेहमीचेच चित्र आहे. यंदाही असाच प्रकार घडल्यास या खड्ड्यांमुळे मात्र मोठमोठे अपघात घडण्याची शक्यता टाळता येणार नाही.