शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘परमात्मा एक सेवक’ मंडळाला लागला गाव स्वच्छतेचा ध्यास

By admin | Updated: October 16, 2015 02:35 IST

येथील परमात्मा एक सेवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गाव स्वच्छतेचा संकल्प ग्रामसभेत केला.

बोंडगावदेवी : येथील परमात्मा एक सेवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गाव स्वच्छतेचा संकल्प ग्रामसभेत केला. ग्रामसभेत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समितीची निवड करण्यात आली. याच सभेत गावातील परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने महिन्यातून दोन दिवस ग्रामसफाई करण्यात येईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.काही दिवसांपूर्वी गावातील बहुतांश सर्वसामान्य नागरिक दारूच्या आहारी गेले होते. कित्येकांच्या संसाराची राखरांगोळी झाली होती. दारुच्या नशेत अनेक कुटुंबाच्या घरी कलह निर्माण झाला होता. पती-पत्नीच्या नात्यामधील दरी दुरावत होती. अशा कुटुंबांनी अखेर परमात्मा एक सेवक मंडळाचा सहारा घेतला. आज शेकडो कुटुंब मंडळाचे हितचिंतक झाले. त्यांच्या संसारात गोडवा निर्माण झाला. बाई-बाटली दूर झाली. घरात आर्थिक स्थैर्य नांदू लागले. पोर- बाळं गोड्या गुलाबीने वावरताना गावात दिसत आहेत. आपले कुटुंब सन्मार्गी लावून गावातही आपले योगदान राहावे म्हणून परमात्मा एक सेवक मंडळाचे शेकडो हितचिंतक गावात ग्रामसफाई करण्यासाठी पुढे सरसावले. गावात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान समितीचे अध्यक्ष पतीराम मेश्राम, सचिव राजू ठवरे यांच्या नेतृत्वाखाली समिती गठित करण्यात आली. समिती गठित होताच गावातील परमात्मा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हातात झाडू घेवून ग्रामसफाई करण्यात आली. महिन्यातून दोन दिवस गावात ग्रामसफाई करण्याचे काम मंडळाच्या वतीने केले जाणार आहे. ग्रामसफाई शुभारंभाप्रसंगी सरपंच राधेशाम झोळे, समितीचे अध्यक्ष पतीराम मेश्राम, सचिव राजू ठवरे, सदस्य दिनेश फुल्लूके, साधू मेश्राम, शालिक बोरकर, परमात्मा एक सेवक मंडळाचे व्यंकट शेंदरे, भाऊदास बरैया, महादेव मेश्राम, रामू मेश्राम, प्रेम सिखरामे, रुपचंद मेश्राम, विमल मेश्राम, रेखा मेश्राम, शिला मेश्राम, छाया मानकर, रामदास मेश्राम, वैशाली मानकर, रेखा सिखरामे, जगन नेवारे, पतीराम देवरे, गणेश बरैया आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)