शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांच्या विळख्यात पालडोंगरी गाव

By admin | Updated: March 17, 2016 02:34 IST

तिरोडा तालुक्यातील पालडोंगरी गाव अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप तेथील जगलाल रहांगडाले,

ग्रामस्थांचे आरोप : समस्या सोडवागोंदिया : तिरोडा तालुक्यातील पालडोंगरी गाव अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप तेथील जगलाल रहांगडाले, गणराज रहांगडाले, दिलीप उईके व इतर ग्रामस्थांनी केलेला आहे.पालडोंगरी ग्रामपंचायतमध्ये सभा घेवून रोजगार सेवक व कृषी मित्र बदलविण्यात यावे, असा ठराव घेण्यात आला होता. मात्र अद्यापही त्यांना बदलविण्यात आले नाही. सचिव गावकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो, असा आरोप आहे. जिल्हा परिषदेकडून गावाला नळयोजना मिळाली. संपूर्ण गावात पाईप लाईन घालण्यात आली. दोन वर्षांपूर्वीच ते काम पूर्ण झाले. मात्र अद्याप पाणी पुरवठा सुरू करण्यात आला नाही. नळ योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच ज्या जागेवर पाण्याची टाकी बनविण्यात येत आहे, ती जागा शासकीय नसून दुसऱ्या व्यक्तीच्या नावे रेकार्डवर आहे, अशी ग्रामस्थांची ओरड आहे. ग्रामपंचायत स्तरावर उपसमित्यांची स्थापना केली जाते. मात्र सचिवाने आपल्याच मनमर्जीने समित्या स्थापन केल्या आहेत. त्या समित्या पुन्हा दुसऱ्यांदा स्थापन करण्यात याव्यात, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी ग्रामसभेत निवेदनही देण्यात आले. परंतु सचिवांनी दुर्लक्ष केले. मागील तीन-चार वर्षांपासून गावात शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. परंतु लाभार्थ्यांना अद्याप अनुदान देण्यात आले नाही. गावात नुकताच नवीन सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. परंतु महिन्याभरातच तो निकृष्ट रस्ता उखडून गिट्टी बाहेर आली आहे. या प्रकाराबाबत चौकशीची मागणी केली जात आहे.ग्रामपंचायतचे सचिव व ग्रामपंचायतचे सदस्य यांचे संगनमत असून गावाचा विकास करणारेच गावाच्या दुर्गतीसाठी ते जबाबदार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)