ग्रेडर अभावी धान खरेदी झाली ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 05:00 AM2020-11-22T05:00:00+5:302020-11-22T05:00:16+5:30

शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी शासनाने मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ हे दोन मुख्य अभिकर्ते नियुक्त केले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत बहुतांश धान्य खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. मात्र आदिवासी विकास महामंडळाच्या अधिनस्थ जिल्ह्यातील एकही धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही. धान खरेदी केंद्र सुरु झाले नसल्यामुळे आदिवासी क्षेत्रातील शेतकरी चिंतातूर आहेत.

Paddy was purchased due to lack of graders | ग्रेडर अभावी धान खरेदी झाली ठप्प

ग्रेडर अभावी धान खरेदी झाली ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देआदिवासी महामंडळाचा धान खरेदीला खो : केवळ केंद्राचा शुभारंभ करुन मोकळे

  लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध :  जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाचे ४४ धान खरेदी केंद्र ग्रेडर अभावी अद्यापही सुरु झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले असून त्यांना पुन्हा खासगी व्यापाऱ्यांच्या दारात उभे राहण्याची पाळी आली आहे. 
शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी शासनाने मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ हे दोन मुख्य अभिकर्ते नियुक्त केले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत बहुतांश धान्य खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. मात्र आदिवासी विकास महामंडळाच्या अधिनस्थ जिल्ह्यातील एकही धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही. धान खरेदी केंद्र सुरु झाले नसल्यामुळे आदिवासी क्षेत्रातील शेतकरी चिंतातूर आहेत. यंदा नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता धान खरेदी केंद्र सुरु करण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. 
यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  गोंदिया जिल्हा आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्थांच्या संघाची एक बैठक देवरी येथे अध्यक्ष शंकर मडावी, सचिव हरिष कोहळे व आदिवासी संस्थेचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडली. आदिवासी विकास महामंडळ जोपर्यत नियमित ग्रेडर देत नाही किंवा ग्रेडर शिवाय खरेदी करण्याचे लेखी आदेश देत नाही तोपर्यंत संस्थेचे खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. महामंडळाने त्वरीत ग्रेडरची व्यवस्था करावी किंवा संस्थांना ग्रेडर नियुक्तीचे अधिकार देवून आदिवासी खरेदी केंद्रांचा तिढा सोडवावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे

Web Title: Paddy was purchased due to lack of graders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.