हाताशी आलेले धान पीक किडींच्या तावडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 06:00 AM2019-09-30T06:00:00+5:302019-09-30T06:00:16+5:30

गत महिन्याभरापासून दररोज पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीने धान पीक धोक्यात आले असताना आता धान पिकावर विविध कीडींनी आक्रमण केले आहे. हलक्याप्रतीचा धान लोंब्यावर आला असून उच्चप्रतीचा धान गर्भावस्थेत आहे. अशा परिस्थितीत कीडींनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

paddy in the pest of crop pests | हाताशी आलेले धान पीक किडींच्या तावडीत

हाताशी आलेले धान पीक किडींच्या तावडीत

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी संकटात : कीड नियंत्रणासाठी महागड्या औषधीचा वापर

मुखरू बागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : अतिवृष्टी पाठोपाठ किडींनी धान पिकावर आक्रमण केले असून महागड्या कीटकनाशकांचा वापर करूनही कीड नियंत्रणात येत नाही. हाताशी आलेले धान पीक धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. लाखनी तालुक्यात सध्या कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.
गत महिन्याभरापासून दररोज पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीने धान पीक धोक्यात आले असताना आता धान पिकावर विविध कीडींनी आक्रमण केले आहे. हलक्याप्रतीचा धान लोंब्यावर आला असून उच्चप्रतीचा धान गर्भावस्थेत आहे. अशा परिस्थितीत कीडींनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतकरी महागडी औषधे फवारून कीड नियंत्रणाचा प्रयत्न करीत आहे. सध्या तुडतुडा, करपा, कडाकरपा याचा अधिक प्रादूर्भाव जाणवत आहे. लाखनी तालुक्यात गराडा परिसरात तुडतुड्याने कहर केला आहे. प्रतिबंधासाठी फवारणीचे डोज दिले जात आहे. पालांदूर परिसरातील पाथरी, मºहेगाव, वाकल, मचारणा, जेवनाळा आदी ठिकाणी धान पीक कीडींच्या कचाट्यात सापडले आहे.

पट्टा पद्धतीत कीड नियंत्रण सोपे
तुडतुड्याच्या नैसर्गीक नियंत्रणासाठी पट्टा पद्धतीत भात लागवड महत्वाची आहे. खताचा उपयुक्त प्रमाणात मात्रा देवून धान पीकाची निगा राखता येते. बांधात पाणी साठवून ठेवू नये, नियमित पावसाचे पाणी येत असल्याने पाणी खूप ठेवू नये, पिकाचे दररोज निरीक्षण करावे, फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे, अशी माहिती कृषी विभागाच्यावतीने दिली जात आहे.

लाखनी तालुक्यात २२ हजार ९०० हेक्टरवर भात लागवड झाली आहे. शेतीशाळांचे आयोजन करून शेतकºयांना कीड नियंत्रणासाठी मार्गदर्शन केले जाते. नाहक खर्च टाकून कीड नियंत्रण आवश्यक आहे.
-पद्माकर गिदमारे, तालुका कृषी अधिकारी, लाखनी.

Web Title: paddy in the pest of crop pests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती