शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्त २०० शेतकऱ्यांना वगळले

By admin | Updated: December 28, 2015 01:55 IST

मागील वर्षी गारपिटीमुळे तिरोडा तालुक्याच्या पालडोंगरी येथील जवळपास २७० शेतकऱ्यांना मोठाच नुकसान सहन करावा लागला.

आरोप ग्रामस्थांचा : कर्मचाऱ्यांनी केला भेदभावगोंदिया : मागील वर्षी गारपिटीमुळे तिरोडा तालुक्याच्या पालडोंगरी येथील जवळपास २७० शेतकऱ्यांना मोठाच नुकसान सहन करावा लागला. परंतु नुकसान सर्वे यादीतून २०० शेतकऱ्यांना वगळून केवळ ७० शेतकऱ्यांची नावे शासनाला देण्यात आली आहेत, असा आरोप पालडोंगरी येथील गणराज रहांगडाले व इतर शेतकऱ्यांनी केला आहे.गेल्यावर्षी गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठेच नुकसान झाले. याबाबत सर्वे करून यादीसुद्धा तयार करण्यात आली होती. मात्र त्यातून २०० शेतकऱ्यांना वगळण्यात आले. याबाबत सदर २०० शेतकऱ्यांच्या सह्यानिशी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना १८ डिसेंबर २०१५ रोजी निवेदन देण्यात आले. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. शासनाच्या अनुदानापासून सदर शेतकऱ्यांना का वंचित ठेवण्यात आले? यादी तयार करणारे? व केवळ ७० शेतकऱ्यांचीच नावे का देण्यात आली? असे प्रश्न सदर शेतकरी विचारत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांच्या शेतात लाखोळी, जवस, गहू व हरभरा नसतानाही त्यांना यादीत समाविष्ट करण्यात आले. एकाच कुटुंबातील दोन-चार नावांचा समावेश करण्यात आला. तसचे बाकीच्या २०० शेतकऱ्यांना वगळण्यात आले. ज्यांच्या शेतात पीक होते, त्यांना शासनाच्या नुकसानग्रस्त यादीतून वगळण्यात आले. यामागे काहीतरी घोळ करण्यात आला, अशी दाट शंका नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. अशा कर्मचारी व पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे. सदर प्रकाराबाबत तलाठी व ग्रामसेवकांना विचारणा केल्यावर त्यांनी माहीत नाही, असे उत्तर दिल्याचे रहांगडाले यांनी सांगितले. तर ज्या शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात जावून नावे दिली होती, त्यांची नावेसुद्धा यादीत नाहीत. सदर प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना नुकसाग्रस्त यादीत समाविष्ट करावे व दोषी असलेल्या कर्मचारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वंचित ठरलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)