शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

३० गावे कव्हरेज क्षेत्राबाहेर

By admin | Updated: December 20, 2014 01:45 IST

तालुक्यातील दरेकसा व आसपासच्या परिसरातील ३० पेक्षा जास्त गावे मागील दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीच्या संपर्क क्षेत्राबाहेर आहेत.

विजय मानकर सालेकसा
तालुक्यातील दरेकसा व आसपासच्या परिसरातील ३० पेक्षा जास्त गावे मागील दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीच्या संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. या भागात मोबाईल टॉवर मंजूर असताना भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) च्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
दरेकसा परिसर हा गोंदिया जिल्ह्यात नक्षलदृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील असून डोंगराळ व अतिदुर्गम भाग आहे. या परिसरात एकूण चार ग्रामपंचायती आहेत. त्याअंतर्गत जवळपास ३० गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे वर्षभर नक्षली कारवायांच्या दहशतीत असतात. त्यातच या परिसरातील राहणारे लोक मोबाईल फोनच्या माध्यमातून तालुका किंवा जिल्ह्याच्या संपर्कापासून गेल्या दीड वर्षांपासून वंचित आहेत.
दरेकसा (जमाकुडो) येथे बी.एस.एन.एल.चे टॉवर होते. दीड वर्षापूर्वीपर्यंत त्या टॉवरच्या भरवशावर परिसरातील लोकांनी बी.एस.एन.एल. कंपनीचे सीमकार्ड घेवून संपर्कासाठी मोबाईलचा उपयोग करीत राहिले. परंतु दीड वर्षापूर्वी नक्षलवाद्यांनी शासनाचा निषेध करण्यासाठी जमाकुडो येथील टॉवरचे मशीन कक्ष जाळून खाक केले. त्याचबरोबर याच परिसरातील टोयागोंदी येथील ग्रामपंचायत इमारतीला आग लावली. त्याच ग्रामपंचायतीचे संपूर्ण रेकार्ड जळून राख झाले.
या घटनेला दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही बीएसएनएल कंपनीने दुसरे टॉवर व मशीन स्थापित केली नाही. त्यामुळे मागील दीड वर्षापासून या परिसरातील लोक मोबाईल सेवेतून वंचित आहेत. तसेच तालुका मुख्यालयापासून हा परिसर खूपच दूर आणि पर्वतरांगांच्या पलीकडे असल्याने तालुक्याच्या ठिकाणावरुन कव्हरेज मिळू शकत नाही.
दरेकसा परिसरात दरेकसा, टोयागोंदी, जमाकुडो आणि कोसमतर्रा या चार ग्रामपंचायतींचा समावेश असून या भागात जवळपास ३० पेक्षा जास्त छोट्या-मोठ्या गावांचा समावेश आहे. यात दरेकसा ग्रामपंचायतअंतर्गत डहाराटोला, बंजारी, नवाटोला, बेवरटोला, दलदलकुही, मुरकुटडोह १,२,३, दंडारी १ व २, टेकाटोला, मुंशीटोला आदी गावांचा समावेश आहे. जमाकुडो ग्रामपंचायतअंतर्गत जमाकुडो, भर्रीटोला, पठानटोला या गावांचा समावेश आहे. टोयागोंदी या ग्रामपंचायतअंतर्गत टोयागोंदी, बोईरटोला, चांदसूरज, बरटोला, विचारपूर, ढुबरुटोला, कोपालगढ, दल्लाटोला, आंबाटोला आदी गावांचा समावेश आहे. कोसमतर्रा, नवाटोला, धनेगाव, सोनारटोला, पिपरटोला या गावांचा समावेश आहे. असे एकंदरित ३० पेक्षा जास्त गाव या भागात मोडतात.
या भागात राहणारे लोक गरीब, आदिवासी असून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांचे प्रमाणसुद्धा मोठे आहे. गरीब आदिवासी लोकांची प्रकृती अचानक गंभीर झाल्यास त्यांना शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा सालेकसा, गोंदिया येथील खासगी दवाखान्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा परिस्थितीत कोणत्याही गावात फोन सेवा नसल्याने अनर्थ घडण्याचे प्रकरणसुद्धा घडत असतात.
दरेकसा (जमाकुडो) येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र, रेल्वे स्टेशन, दोन हायस्कूल, दोन उच्च माध्यमिक विद्यालय, अनेक गावात प्राथमिक शाळा व नक्षलग्रस्त भाग असल्याने येथे एक सशस्त्र दूरक्षेत्रसुद्धा स्थापित आहे. परंतु सामान्य लोकांकडे दळण वळणाचे साधन नसल्याने या भागाशी थेट संपर्क साधणे अवघड असते. यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.