शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कवलेवाडा घाटावरून खुलेआम रेती चोरी

By admin | Updated: May 30, 2014 00:09 IST

तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून मोठय़ा प्रमाणात रेती माफिया अवैधरित्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेती भरून घेऊन जात आहेत. मात्र या प्रकाराकडे तिरोड्याच्या महसूल विभागाचे

महसूल बुडतोय : तलाठी साज्यासमोरूनच होते राजरोसपणे वाहतूकगोंदिया : तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून मोठय़ा प्रमाणात रेती माफिया अवैधरित्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेती भरून घेऊन जात आहेत. मात्र या प्रकाराकडे तिरोड्याच्या महसूल विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून एक प्रकारे रेती चोरीला प्रोत्साहन देत आहेत. यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी लिलावात न काढलेल्या कवलेवाडा रेतीघाटावर आता मोठय़ा प्रमाणात रेती माफिया सक्रीय आहेत. दररोज ५0 ते ६0 ट्रॉली रेती या घाटावरून उपसा केली जात आहे. कवलेवाडा साज्याचे तलाठी पी.एफ. जाधव यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या रेती चोरीला ऊत आल्याचे बोलले जात आहे. कवलेवाडा येथील तलाठय़ांचे कार्यालय याच रेतीघाटाच्या मार्गावर आहे. त्याच मार्गाने अवैध रेतीची वाहतूक होत असताना तलाठी कारवाई का करीत नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तिरोडा शहरातून जाणारे ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या मार्गाने कवलेवाडा नदी घाटावर जातात व अवैध रेती भरून याच मार्गाने परतात. शिवाय चिरेखनी गावाकडील मार्गानेसुद्धा या घाटावर पोहोचून रेती ट्रॉलीत भरून त्याच मार्गाने परत जातात. असे असतानाही तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी याकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे. रेतीमाफियांच्या मनात कारवाईची कोणतीच भिती नसल्यामुळे त्यांचे व्यवहार राजरोसपणे सुरू आहेत. जिल्ह्यातील १७ रेतीघाटांचा लिलाव अद्यापही झालेला नाही. तो न होण्यामागे रेती माफियांचे सामूहिक षडयंत्र असल्याचे बोलले जाते.उल्लेखनिय म्हणजे या अवैध रेतीने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉल्यांच्या सततच्या रहदारीमुळे तिरोडा ते कवलेवाडा रस्ता व चिरेखनी ते कवलेवाडा रस्ता पार उघडून गेला आहे. या रस्त्यांना ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. (प्रतिनिधी)