केवळ २३ टक्के पालकांनी दिले आतापर्यंत संहमतीपत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 05:00 AM2020-11-27T05:00:00+5:302020-11-27T05:00:07+5:30

२३ नाेव्हेंबर विद्यालय सुरु झाली असले तरी अद्यापही विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये अजूनही कोरोनाची भिती कायम आहे. शाळा सुरु होवून तीन दिवसांचा कालावधी लोटला असून ११२२१ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. त्यामुळे अजुनही विद्यार्थ्यांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. 

Only 23% of parents have given consent so far! | केवळ २३ टक्के पालकांनी दिले आतापर्यंत संहमतीपत्र !

केवळ २३ टक्के पालकांनी दिले आतापर्यंत संहमतीपत्र !

Next
ठळक मुद्दे२२६ शाळा झाल्या सुरु : जिल्ह्यातील १४० शिक्षकांना कोरोना

 लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शालेय शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरु केले आहे. यासाठी शिक्षकांची कोरोना चाचणी आणि विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संहमतीपत्र  अनिवार्य करण्यात आले. मात्र आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ २३ टक्केच पालकांनी संहमतीपत्र दिले आहे. तर ३६९ पैकी २२६ शाळा सुरु झाल्या असून  केवळ १८ टक्केच विद्यार्थ्यांनी विद्यालयात हजेरी लावली आहे. जिल्ह्यात ९ वी ते १२ वीपर्यंतच्या एकूण ३६९ शाळा असून यातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या ६१३०१ आहे. 
२३ नाेव्हेंबर विद्यालय सुरु झाली असले तरी अद्यापही विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये अजूनही कोरोनाची भिती कायम आहे. शाळा सुरु होवून तीन दिवसांचा कालावधी लोटला असून ११२२१ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. त्यामुळे अजुनही विद्यार्थ्यांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. 
३६९ शाळांमध्ये ३३१९ शिक्षक कार्यरत असून यापैकी आतापर्यंत २८०९ शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे. यापैकी बऱ्याच शिक्षकांचा चाचणी अहवाल अद्यापही प्राप्त झाला नसून आतापर्यंत १४० शिक्षकांना कोरोनाची बाधा झालीे आहे. पालक-शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या मंजुरीनेच विद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला जात आहे. 

स्वॅब टेस्टमुळे शिक्षकांची संख्या कमी
जिल्ह्यात ९ वी ते १२ वीच्या एकूण ३६९ शाळा असून यामध्ये ३३१९ शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी २८०७ शिक्षकांची कोरोना चाचणी झाली असून ९४७ शिक्षकांचा अहवाल प्राप्त झाला आहे. कोरोनाचा अहवाल प्राप्त न होणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यालय सुरु होण्यास विलंब होत आहे

 आतापर्यंत जिल्ह्यातील २२६ शाळा सुरु झाल्या आहेत. उर्वरित शाळा सुरु करताना पालक-शिक्षक समिती, शालेय व्यवस्थापन समिती आणि शाळा व्यवस्थापन यांच्या सर्वांच्या संहमतीने शाळा सुरु करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेतला जात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची चाचपणी केली जात आहे. 
- प्रफुल्ल कचवे, शिक्षणाधिकारी

Web Title: Only 23% of parents have given consent so far!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.