शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

बियाणांसाठी 1,327 शेतकऱ्यांचेच नशीब फळले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांना महाबीजच्या अधिकृत केंद्रावरून अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना परमिट तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून उपलब्ध करून दिले आहे. अनुदानावरील बियाणे वाटपाच्या दोन योजना असून, एका योजनेंतर्गत १०० टक्के, तर एका योजनेंतर्गत प्रतिक्विंटलमागे २० टक्के सूट दिली जात आहे. 

ठळक मुद्देअनुदानावर मिळणार बियाणे : ६९ शेतकरी वेटिंगवर : खरीप हंगामासाठी होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत भात कडधान्य खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते. अनुदानावरील बियाणांसाठी जिल्ह्यातील १,३९६ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. अर्ज अधिक आल्याने प्राप्त अर्जांची लॉटरी काढण्यात आली. १,३९६ अर्जांपैकी १,३२७ शेतकऱ्यांचे नशीब उजळले, तर ६९ शेतकरी वेटिंगवर आहेत. या शेतकऱ्यांना महाबीजच्या अधिकृत केंद्रावरून अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना परमिट तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून उपलब्ध करून दिले आहे. अनुदानावरील बियाणे वाटपाच्या दोन योजना असून, एका योजनेंतर्गत १०० टक्के, तर एका योजनेंतर्गत प्रतिक्विंटलमागे २० टक्के सूट दिली जात आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जात असल्याने धानाच्या बियाणांच्या मागणीसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. त्यापैकी १३२७ अर्ज पात्र ठरले आहेत.  

महागडे बियाणे परवडणार कसे

खते आणि बियाणांच्या किमतीमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. त्यामुळे शेतीच्या लागवड खर्चात वाढ झाली आहे. यंदा बियाणांचे दर क्विंटलमागे पाचशे ते सहा रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे महागडे बियाणे खरेदी कसे खरेदी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहेत. -मंसाराम चिखलोंढे, शेतकरीमागील दीड वर्षापासून शेतकरी कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यातच आता बियाणे आणि खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने शेती करायची कशी, असा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून द्यावे.-दिलीपसिंह गहरवार, शेतकरी आधीच पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने आधीच शेतीचा लागवड खर्च वाढला आहे. त्यातच आता खते, बियाणांचे दरसुद्धा वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. त्यामुळे शासनाने यंदा शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्याची गरज आहे.-निहारीलाल दमाहे, शेतकरी  

 

टॅग्स :Farmerशेतकरी