शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख विद्यार्थी घेणार ‘वाचन आनंद’

By admin | Updated: December 31, 2015 01:49 IST

विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात.

नरेश रहिले गोंदियाविद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना एक दिवस दप्तरापासून मुक्ती देवूनही त्यांना ज्ञानार्जन करता यावे यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीत ३१ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांना वाचन आनंद देण्यासाठी दप्तर विरहित दिन साजरा करण्याचा ठराव घेतला आहे. या ठरावानुसार गोंदिया जिल्ह्यातील एक लाख विद्यार्थी ३१ डिसेंबर रोजी शाळेत दप्तर घेऊन जाणार नाहीत तर आपल्या शाळेतील ग्रंथालय व वाचनालयातील पुस्तक त्या दिवशी वाचणार आहेत. दप्तरविरहीत दिन साजरा करण्यासाठी शाळेतील ग्रंथालयातील पुस्तके प्रदर्शनात आणून ठेवले जाणार आहेत. घरची मासिके, जूनी पुस्तके, गावातील ग्रंथप्रेमी लोकांजवळील उपयुक्त पुस्तके विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावी या संबंधीत सूचना गटशिक्षणाधिकाच्या माध्यमातून संबंधीत मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. या दिवसी वाचन स्पर्धेचे आयोजन जिल्ह्यातील ११०० शाळांमध्ये घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांकडून आदर्श वाचन घेण्यासाठी विद्यार्थी मला आवडलेली पुस्तक, माझा आवडता लेखक, आवडलेल्या पुस्तकाचे परिचय इत्यादी उपक्रम प्रत्येक शाळास्तरावर आयोजित करण्यासंबंधी सूचना गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद येणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आल्या आहे. शालेय ग्रंथालयातील विद्यार्थ्यांनी वापरलेल्या पुस्तकांची नोंद वाटप रजिस्टरमध्ये घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने २३ डिसेंबर रोजी घेतलला ठराव एक दिवस दप्तर मुक्ती अन् आनंदाचा अभ्यास म्हणून वर्षाचा अखेरचा दिवस म्हणून निवडला आहे. गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा यात सहभागी झाल्या असून गोंदिया जिल्ह्यातील ९९ हजार ९८५ विद्यार्थी वाचन आनंद दप्तर विरहित दिन साजरा करणार आहेत. शिक्षणाधिकाऱ्याच्या पुढाकाराने बालमनावर संस्कार करणे सुरू आहे.