कंटेनर-दुचाकीच्या अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 05:00 AM2020-09-16T05:00:00+5:302020-09-16T05:00:18+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरकडून गोंदियाकडे जात असलेल्या कंटेनर क्रमांक टीएन ०४-एसी १७९४ ने तिरोडाकडून आंधळगावकडे (भंडारा) जात असलेल्या हरिदयाल खैरे यांच्या दुचाकी क्रमांक एमएच ३६-एई ८७३६ ला धडक दिली. यामध्ये खैरे यांचा उजवा पाय जांघेपासून तुटल्याने खूप रक्तस्त्राव झाला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील धरमदास बाहे (५२,रा.भंडारा) दुचाकीसोबत सुमारे २५ फूट फरफटत गेले.

One killed in a container-bike accident | कंटेनर-दुचाकीच्या अपघातात एक ठार

कंटेनर-दुचाकीच्या अपघातात एक ठार

Next
ठळक मुद्देसरांडी जवळील घटना : दोन जण गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : तालुक्यातील ग्राम सरांडी जवळ कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात १ जण जागीच ठार झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.१५) सकाळी ८.३० वाजतादरम्यान तुमसर मार्गावरील सरांडी वळणावर घडली. मृताचे नाव हरिदयाल मोतीराम खैरे (५२,रा. आंधळगाव) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरकडून गोंदियाकडे जात असलेल्या कंटेनर क्रमांक टीएन ०४-एसी १७९४ ने तिरोडाकडून आंधळगावकडे (भंडारा) जात असलेल्या हरिदयाल खैरे यांच्या दुचाकी क्रमांक एमएच ३६-एई ८७३६ ला धडक दिली. यामध्ये खैरे यांचा उजवा पाय जांघेपासून तुटल्याने खूप रक्तस्त्राव झाला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील धरमदास बाहे (५२,रा.भंडारा) दुचाकीसोबत सुमारे २५ फूट फरफटत गेले. याप्रसंगी मागून येणारे गोरेगाव येथील वामनराव तुळशीराम राऊत यांच्या दुचाकी क्रमांक एमएच ३५-एएन ०९३० ला धडक दिली. वामन राऊत हे तुमसर येथे रेल्वे विभागात खलासी पदावर कार्यरत असून ते सकाळी आपल्या गावावरून कामावर जात असल्याचे समजते.
या दुर्घटनेची माहिती सरांडी गावचे सरपंच माणीक वाणी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून तिरोडा पोलिसांना माहिती दिली. जखमींवर तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून गोंदियाला पुढील उपचाराकरीता पाठवण्यात आले. अपघात होताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

Web Title: One killed in a container-bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात