शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

३०६६ कामांपैकी एकही काम सुरू नाही

By admin | Updated: May 16, 2016 01:55 IST

भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी व दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले.

दीड महिना लोटला : ७७ गावांसाठी २०७० कामे प्रस्तावित नरेश रहिले  गोंदियाभूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी व दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानाच्या पहिल्या टप्प्याचे उद्दिष्ट पुर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु दुसऱ्या टप्प्यातील एकही काम सुरू न झाल्यामुळे जलयुक्त शिवारची अंमलबजावणी कशी होते याचा प्रयत्य नागरिकांना येत आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील दीड महिन्याचा कालावधी लोटला मात्र जलयुक्त शिवार अभियानाचे एकही काम सुरू झाले नाही.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ साठी ७७ गावांचा समावेश करण्यात आला. मंजूर, प्रस्तावित व दुरूस्ती अशा ३०६६ कामांसाठी ९६ कोटी ३५ लाख ८० हजार रूपये खर्च करण्याचे ठरविण्यात आले. यात ७१६ काम मंजूर करण्यात आले. सदर कामांवर २६ कोटी ३३ लाख ४७ हजार रूपये खर्च करण्यात येणार आहे. यात कृषी विभागाच्या २८८ कामांवर ७ कोटी ४३ लाख ९२ हजार, जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या ३० कामांवर ३ कोटी ६७ लाख १३ हजार, पंचायत समितीच्या ३९५ कामांवर १४ कोटी ६९ लाख ८१ हजार, जलसंधारणच्या ३ कामावर ५२ लाख ६१ हजार खर्च करण्यात येणार आहे. प्रस्तावित २०७० नवीन कामांवर ५७ कोटी ९६ लाख ९३ हजार खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले. यात कृषि विभागाचे १३९१ कामांसाठी ३१ कोटी ०९ लाख ३१ हजार, लघु सिंचन विभागाच्या २० कामांसाठी ३ कोटी २३ लाख ५० हजार, लघु सिंचन जलसंधारणाच्या २५ कामासाठी ६ कोटी २४ लाख ३२ हजार, वन विभागाच्या ६३४ कामासाठी १७ कोटी ३९ लाख ८० हजार रूपये देण्याचे ठरले. आता दुसऱ्या टप्याची कामे पावसाळ्यानंतर होणार आहेत. त्यामुळे पावसाळ््यातील चार महिने ही कामे होणार नसून जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्प्यातील कामे कशी होतात हे बघायचे आहे.