शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

रासेयोतून नि:स्वार्थ सेवेची गरज

By admin | Updated: September 29, 2014 23:08 IST

माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रिद आहे. रासेयो आपल्याला लोकशाही, सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देते. नि:स्वार्थ सेवेची गरज दाखवून देते, असे मत विधी

गोंदिया : माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रिद आहे. रासेयो आपल्याला लोकशाही, सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देते. नि:स्वार्थ सेवेची गरज दाखवून देते, असे मत विधी विभागाच्या प्रा. अश्विनी दलाल यांनी व्यक्त केले.नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात अध्यक्षीय मार्गदर्शनातून त्या बोलत होत्या. राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला.राष्ट्रीय सेवा योजना दिवस विविध कार्यक्रमांनी प्राचार्य योगेश नासरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रासेयोच्या २०० स्वयंसेवकांनी एक मुठ अन्न या उपक्रमाची सुरूवात केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अश्विनी दलाल, अतिथी म्हणून विधी विभागाचे प्रा. योगेश बैस, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बबन मेश्राम, विधी विभाग प्रमुख प्रा. सुयोग इंगळे उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविकेतून रासेयो स्वयंसेवक योगेश खोब्रागडे यांनी उपक्रमाची संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी तांदूळ, दाळ, गव्हाच्या स्वरूपात घरून प्रत्येकी मुठभर धान्य एकत्रित करून रासेयोच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू लोकांना महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ आॅक्टोबरला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावून मदत करण्यात येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान समाजसेवा करता येईल. परिसरातील लोकांना समजून घेता येईल. यानंतर विद्यार्थी व वक्त्यांची भाषणे झालीत.कार्यक्रमाचे संचालन पूजा उके यांनी तर आभार श्याम नागज्योती यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीणा उंदीरवाडे, छविंद्र मेश्राम, रमा ब्राह्मणकर, शुभम शिंगाडे, प्रतिक सोनवाने, सत्यम गलानी, वैभव शहारे, राखी पटले, दीपिका हलमारे, प्रवीण बांबोर्डे, ममिता पाचे, सुरेश बोपचे, मिनल पटले, यामिना सुलाखे, सावित्री रहांगडाले, चेतन दिहारी, शुद्धरेखा बोरकर, रक्षा रामटेके, नूतन खोब्रागडे, सुनीता कश्यप, हर्षा बिजेवार, पुष्पा लांजेवार, अर्चना नागरिकर, भरत माने, अक्षय विश्वकर्मा, रोहिणी नापुर्ते, प्रियंका सोनवाने यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)