शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हक्कांबद्दल जाणीव आवश्यक

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ७० वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. तरी सुध्दा समाजातील अनेक लोकांना आपल्या अधिकारांची जाणीव नाही.

संजय पुराम : मानवाधिकार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन सालेकसा : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ७० वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. तरी सुध्दा समाजातील अनेक लोकांना आपल्या अधिकारांची जाणीव नाही. जाणीव नसल्यामुळेच कमजोर वर्गातील पिडीतांची नेहमी आर्थिक व सामाजिक पिळवणूक होत राहीली. समाजातील घटकाचा विकास घडवायचा असेल तर मानवी हक्काबद्दल प्रत्येकाला जाणीव असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले. ते तालुक्यातील ग्राम झालिया येथे मानवाधिकार संघटनेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती देवराज वडगाये होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे, जिल्हा परिषद सदस्य विजय टेकाम, माजी पं.स.सभापती यादनलाल बनोठे, सरपंच मनोज दमाहे, उपसरपंच हेमराज सुलाखे, तंटामुक्त समिती अध्यक्ष धरमदास कुराहे, पोलीस पाटील कविता कुराहे, आयोगाचे जिल्हाध्यक्ष कुरैशी, लेखिका उषा किरण आत्राम व अन्य उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पुराम यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समान अधिकार देणारी राज्यघटना निर्माण केली. परंतु त्या राज्यघटनेत लिहीलेल्या गोष्टीपासून आजही अनेक लोक अनभिज्ञ आहेत आणि पारंपारिक गुलामगिरीत जगत आहेत. अशा लोकांमध्ये आपल्या हक्काविषय जाणीव असणे आवश्यक आहे. यासाठी काही सरकारी-गैरसरकारी संगठना मोलाची भूमिका पार पाडत असतात. यामध्ये मानवाधिकार आयोग यशाची वाटचाल करीत असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनीही उपस्थितांना संबोधीत केले. संचालन करून आभार सोहन दमाहे यांनी मानले. कार्यक्रमासाठी कैलास दमाहे, कस्तुरचंद जोग, देवराम बरैया, अशोक शेंडे अदिंनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)