शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी व्यथित

By admin | Updated: August 10, 2014 23:04 IST

नुकत्याच आटोपलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार राकेश ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने

गोंदिया : नुकत्याच आटोपलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार राकेश ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने व्यथित होऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जे नगरसेवक अनुपस्थित होते त्यांना पक्षाने उसकवण्याचा प्रश्नच नसून काँग्रेसचा हा आरोप अत्यंत चुकीचा असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिव शर्मा यांनी एका पत्रकातून स्पष्ट केले.गोंदिया नगर पालिकेवर आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. परंतू दोन दिवसांपूर्वी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसबहुल तीन नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे सत्ताधारी दोन्ही काँग्रेस अल्पमतात येऊन त्यांना सत्ता गमवावी लागली. न.प.अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी भाजप-सेनेचे उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक अनुपस्थित होते. शिवाय एका नगरसेवकाने तटस्थ राहून काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले नाही. परिणामी १७ विरूद्ध ११ अशा ६ मतांनी काँग्रेसचे राकेश ठाकूर यांना तर १७ विरूद्ध १२ अशा ५ मतांनी राष्ट्रवादीचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर वालदे यांचा पराभव झाला.नगर पषिदेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाची भूमिका वठविण्याची वेळ आल्याने हा पराभव काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यातूनच राकेश ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रक काढून राष्ट्रवादीच्या अनुपस्थित असलेल्या ४ नगरसेवकांमुळेच पराभव झाल्याचे सांगत धोका दिल्याचा आरोप राष्ट्रवादीवर केला. त्या नगरसेवकांवर पक्षाने कारवाई करण्याची मागणी केली. एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भूमिकेवरही शंका व्यक्त केली. प्रसिद्ध पत्रक काढून जाहीरपणे व्यक्त केलेल्या या नाराजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र तीव्र आक्षेप घेतला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांची ही भूमिका चिंताजनक असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अशा पद्धतीने पत्रकबाजी करणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना नाहक बदनाम करणे योग्य नसल्याचे शहराध्यक्ष शर्मा यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये सामंजस्य नसल्याचे उघडपणे दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)