राष्ट्रवादी काँंग्रेसच विकास कामांना प्राधान्य देते- जैन

By Admin | Updated: October 25, 2015 01:48 IST2015-10-25T01:48:10+5:302015-10-25T01:48:10+5:30

शासनाच्या विविध योजना, सी.एस.आर. योजना व खासदार निधीच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी खर्च करून ...

Nationalist Congress gives priority to development works - Jain | राष्ट्रवादी काँंग्रेसच विकास कामांना प्राधान्य देते- जैन

राष्ट्रवादी काँंग्रेसच विकास कामांना प्राधान्य देते- जैन

गोंदिया : शासनाच्या विविध योजना, सी.एस.आर. योजना व खासदार निधीच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी खर्च करून सीमेंट, रस्त्याचे बांधकाम, बोरवेल, समाजभवन, सांस्कृतिक भवन असी विकास कामे केली आहेत. अर्जुनी बस स्थानकाचे बांधकाम, रेल्वे स्टेशनवर गाड्यांचे धांबे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नामुळे शक्य झाले.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विकास कामांना प्राधान्य देत असल्याचे उद्गार आ.राजेंद्र जैन यांनी काढले. अर्जुनी मोरगाव येथील आयोजित नगर पंचायतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, देवेंद्रनाथ चौबे, सुशिला हलमारे, रतिराम राणे, जि.प.सदस्य किशोर तरोणे, हेमंत भांडारकर, बँकेचे संचालक भोजराज रहिले, बंडू भेंडारकर उपस्थित होते.
यावेळी निवडणूकीत उभे असलेले शालू बडोले, पौर्णिमा शहारे, मनोहर शहारे, रंजना मडावी, चंद्रा येरणे, वीना आरेकर, राकेश जायस्वाल, उलझा लाडे, माधुरी पिंपळकर, योगराज मिश्रा, हेमलता घाटबांधे, अनिल मेहता, शालीकराम हाथझाडे, मधुकर कुंभरे, प्रकाश शहारे, उषा कापगते, राजेंद्र जांभुळकर उपस्थित होते. संचालन जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Nationalist Congress gives priority to development works - Jain