शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तीपेक्षा पक्ष तर पक्षापेक्षा राष्ट्र मोठे

By admin | Updated: December 26, 2015 01:54 IST

भारतामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा आणीबाणी जाहीर करुन संबंधित विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले, ...

कृषीमंत्री बिसेन : तिरोड्यात सुशासन दिनतिरोडा : भारतामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा आणीबाणी जाहीर करुन संबंधित विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले, त्यात अटलबिहारी वाजपेयीसुद्धा होते. त्याचा परिणाम नंतरच्या काळात होऊन काँग्रेस सरकार पडून मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्याच कार्यकाळात अटलबिहारी वाजपेयी विदेशमंत्री झाले. त्यांनी विदेशात आपली छाप उमटविली. व्यक्तिपेक्षा पार्टी मोठी व पार्टीपेक्षा राष्ट्र मोठे असते. राष्ट्रासाठी कार्य करणे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे, असे मत मध्यप्रदेशचे कृषी व सहकारमंत्री गौरीशंकर बिसेन यांनी व्यक्त केले. आ.विजय रहांगडाले यांनी शुक्रवारी तिरोड्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित सुशासन दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.आ.रहांगडाले यांच्या कार्यालयासमोरील पटांगणावर घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात आ.अनिल सोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी मार्गदर्शन करुन वाजपेयी यांच्या राजकीय जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सीता रहांग़डाले, माजी आ.हरिष मोरे, भजनदास वैद्य, खोमेश्वर रहांग़डाले, हेमंत पटले, सुनील पालांदूरकर, दिलीप चौधरी, सुरेंद्र बिसेन, जि.प. सदस्य रोहिनी वरखडे, रजनी कुंभरे, पवन पटले, डॉ.बी.एस. रहांगडाले, कृउबासचे डॉ.चिंतामन रहांगडाले, डॉ.वसंत भगत, संजय बैस, रमनिक सोयाम, राणी रहांगडाले, हेमलता पटले हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मदन पटले यांनी तर आभार अनुप बोपचे यांनी मानले. यशस्वीतेसाठी खडकसिंग जगने, मोनू भूते, प्रभु सोनेवाने, भाऊराव कठाने, सुनील बन्सोड, तेजराम चव्हाण, शुक्राचार्य ठाकरे, स्वानंद पारधी, पंकज रहांगडाले, चंदाताई शर्मा, थानसिंग रहांगडाले, डॉ. रामप्रसाद पटले यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)योजना पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाहीआ. विजय रहांगडाले यांनी प्रास्ताविकातून आपल्या विधानसभा क्षेत्रात सिंचन व्यवस्था कशी परिपूर्ण होईल, अडलेला सिंचन प्रकल्प, खळबंदा जलाशय, चोरखमारा जलाशय, बोदलकसा जलाशय यात पाणी कसे टाकता येईल, तसेच पाईपलाईनचे नियोजन बदलवून रस्त्याच्या कडेने नेवून लवकर या योजना पूर्ण केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असे आश्वासन यावेळी दिले. तिरोडा शहरात लोकसंख्येच्या वाढीमुळे शुद्ध पाणी आवश्यक तेवढे मिळत नाही. त्यासाठी २० कोटी रु.ची योजना पाईपलाईन मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विविध कामांसाठी आमदार निधीचा वापर होत असल्याचे सांगितले.