शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नंदकिशोरची भरारी

By admin | Updated: June 4, 2014 00:09 IST

घरामध्ये अनुकूल असे कोणतेही शैक्षणिक वातावरण नसताना फक्त जिद्दिने खांबी/पिंपळगाव या लहानशा खेडेगावातील नंदकिशोर सदानंद ऊरकुडे या विद्यार्थ्याने बारावीच्या परिक्षेत ९३.३८ टक्के गुण घेवून

अमरचंद ठवरे- बोंडगावदेवीघरामध्ये अनुकूल असे कोणतेही शैक्षणिक वातावरण नसताना फक्त जिद्दिने खांबी/पिंपळगाव या लहानशा खेडेगावातील नंदकिशोर सदानंद ऊरकुडे या विद्यार्थ्याने बारावीच्या परिक्षेत ९३.३८ टक्के गुण घेवून यश संपादन केले. नंदकिशोरच्या अप्रतीम यशाबद्दल खांबी या गावात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. नंदकिशोरच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडिलांचे चान्ना/बाक्टी येथे सलुन आहे. आपल्या पारंपारिक व्यवसायातूनच ते कुटूंबाचा सांभाळ करुन सदा मुलांच्या शिक्षणासाठी विशेष काळजी घेतात. अर्जुनी/मोर येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात नंदकिशोर बाराव्या वर्गात विज्ञान शाखेत शिकत होता. हलाखीची परिस्थिती असल्याने नंदकिशोर दररोज सायकलने नऊ किलोमीटरचा प्रवास करून  शिक्षणासाठी जात होता. मनात ध्येय  व जिद्द बाळगूण असणारा नंदकिशोर अशा स्थितीतही कधी निराश झाला नाही. थकून आल्यावरही तेवढय़ाच उत्साहाने तो रोज अभ्यास करायचा. त्याचे फलीतही त्याला तसेच मिळाले. बारावीच्या निकाल घोषीत झाला व त्यात नंदकिशोर ने गणित विषयात १00 पैकी ९९,  रसायनशास्त्रामध्ये ९७, जिवशास्त्र ९५, भौतिकशास्त्रात ९२ गुण मिळविले. ९३. ३८ टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले. पुढे केमीकल इंजिनीअर बनण्याची मनीषा त्याने व्यक्त केली. वडील सदानंद, आई स्मीता व लहान भाऊ राजन असा ऊरकुडे परिवार अत्यंत साधेपणाने खाबी येथे वास्तव्यास आहे. साधारण घर असल्याने अभ्यासासाठी स्वतंत्र अशी खोली नाही. परंतु दहावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या आई-वडिलांचे सततचे प्रोत्साहन  व पोटाला चिमटा देऊन शैक्षणिक साहीत्य उपलब्ध करुन दिल्यामुळेच यशाचे शिखर गाठता आल्याची प्रतिक्रिया नंदकिशोरने व्यक्त केली. वाचना व्यतिरीक्त इतर कोणताही छंद नसल्याचेही त्याने आवर्जुन सांगितले. आई-वडील मजूरी व आपला सलुनचा व्यवसाय सांभाळून मुलांच्या शिक्षणासाठी त्यागाची वृत्ती अंगीकारत असल्याचे दिसून आले. पारंपारीक व्यवसाय न करता उच्च शिक्षण घेऊन प्रगती साधावी अशी इच्छा नंदकिशोरच्या आईने व्यक्त केली. खांबी या लहानशा खेडेगावातील नंदकिशोरचे यश ईतरांना लाजवेल असेच आहे. नंदकिशोरने दहावी मध्ये येथील मानवता विद्यालयातून ९२ टक्के गुण घेऊन पहिला क्रमांक पटकाविला होता. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करायचा तंत्र त्याने अवलंबिला होता. साध्या झोपडीमध्ये राहून नंदकिशोर मिळविलेले यश निश्‍चित अभिमानास्पद आहे.