शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा गूढ मृत्यू

By admin | Updated: October 17, 2015 02:28 IST

नवेगावजवळील देवलगावच्या नत्थूजी पुस्तोडे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका आदिवासी विद्यार्थिनीची प्रकृती ....

अर्जुनी मोरगाव/नवेगावबांध : नवेगावजवळील देवलगावच्या नत्थूजी पुस्तोडे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका आदिवासी विद्यार्थिनीची प्रकृती अचानक बिघडून तिचा गूढपणे मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१५) रात्री १० वाजतादरम्यान घडली. कविता मंगलू कुंजाम असे त्या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव आहे.मृतक कविता ही मूळची धमदीटोला (ता.देवरी) येथील रहिवासी आहे. ती आश्रमशाळेत अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. ९ आॅक्टोबर रोजी कविता स्वगावी गेली होती. गुरुवारी (१५) सायंकाळी ती आश्रमशाळेत परत आली. तिने शाळेतच भोजन केले. त्यानंतर गावी गेलेल्या कालावधीचा अभ्यास व गृहपाठ घेवून ती अभ्यासाला बसली. रात्री ८ वाजेदरम्यान अचानक तिची प्रकृती बिघडली. तिला नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी गोंदिया येथे हलविण्याचा सल्ला दिला. नवेगावबांध येथून गोंदियाला नेत असताना डव्वानजीक तिचा मृत्यू झाला असावा अशी शंका आली. त्यामुळे वाहनात असलेल्या परिचारिकेने ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांनी रुग्णालयात आणण्याचा सल्ला दिला. तिथे तिची तपासणी केली असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सडक अर्जुनी येथेच शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली. मात्र वाटेत मृत्यू झाला असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नकार दर्शविला. त्यानंतर कविताचा मृतदेह नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.या प्रकरणाची माहिती प्रकल्प कार्यालय देवरी यांना कळविण्यात आली. आश्रमशाळेला प्रकल्प कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी बेले यांनी भेट दिली. उत्तरीय तपासणीस विलंबशुक्रवारी (दि.१६) सकाळी उत्तरीय तपासणीची (शवविच्छेदन) प्रक्रिया सुरू करावयाची होती. मात्र महिला डॉक्टर नसल्याने गोंदिया येथून महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला पाचारण करण्यात आले. मात्र उशिरापर्यंत त्या पोहोचल्या नाही. शेवटी सडक अर्जुनी येथील डॉक्टर शवविच्छेदनासाठी येणार होते, मात्र पोलीस संरक्षण नसल्याने त्यांनी येण्यास नकार दर्शविला. यात बराच वेळ निघून गेला. अखेर पावणेचार वाजता कविताची उत्तरीय तपासणी करण्यात आली व मृतदेह वडीलांच्या सुपूर्द करण्यात आला. ही उत्तरीय तपासणी तब्बल दोन तासपर्यंत चालली. मृत्यूचे कारण अद्यापही कळू शकले नाही.