शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

म्हसवानी येथील अपघात नसून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 05:00 IST

खुमराज रहांगडाले हे रविवारी (दि. १३) सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान मुलीची प्रकृती बरी नसल्याने औषध आणण्यासाठी दुचाकीने (क्र. एमएच ३५-एआर ७९१९) खोडशिवनी येथे जात असता खोडशिवणी ते म्हसवानी मार्गावर रस्त्याच्या कडेला ते जखमी अवस्थेत मिळून आले होते व त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.  प्रकरणी त्यांच्या पुतण्या विजय डेकनलाल रहांगडाले (रा.म्हसवानी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

ठळक मुद्देपाच आरोपींना केली अटक : डुग्गीपार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  मुलीची प्रकृती बरी नसल्याने औषध आणण्यासाठी गेलेला इसम जखमी अवस्थेत आढळून येऊन त्यातच मृत्यू झाल्याने अगोदर हा अपघात वाटत होता. मात्र तो अपघात नसून खून असल्याचे मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत उघडकीस आले असून, डुग्गीपार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. रविवारी (दि. १३) घडलेल्या या प्रकरणातील मृताचे नाव खुमराज बळीराम रहांगडाले (५५, रा.म्हसवानी) असे आहे.खुमराज रहांगडाले हे रविवारी (दि. १३) सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान मुलीची प्रकृती बरी नसल्याने औषध आणण्यासाठी दुचाकीने (क्र. एमएच ३५-एआर ७९१९) खोडशिवनी येथे जात असता खोडशिवणी ते म्हसवानी मार्गावर रस्त्याच्या कडेला ते जखमी अवस्थेत मिळून आले होते व त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.  प्रकरणी त्यांच्या पुतण्या विजय डेकनलाल रहांगडाले (रा.म्हसवानी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र सोमवारी (दि. १४) उत्तरीय तपासणी अहवालात त्यांच्या डोक्यावर व कानाजवळ असलेल्या जखमा धारदार हत्याराच्या असल्याचे सांगितले. यावरून मृताचा भाऊ उदेलाल ब‌ळीराम रहांगडाले (५२,रा. म्हसवानी) यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता, तर पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून डुग्गीपार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने पथक गठित करून प्रकरणाचा तपास सुरू केला. यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीवरून, योगेश फागुलाल बोपचे (२७, ) याला ताब्यात घेतले असता त्याने मित्रांच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले. त्यानुसार, पमेश पन्नालाल पटले व विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले, तर डुग्गीपार पोलिसांनी अंशुमन गोविंदा निमावत (२३, रा.बसंतनगर, गोंदिया) याला भंडारा येथील बसस्थानक येथून व गणेश बंडू येटरे (२०,रा. बसंतनगर, गोंदिया) याला गोंदियातून ताब्यात घेतले.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी