म्हसवानी येथील अपघात नसून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 05:00 AM2021-06-19T05:00:00+5:302021-06-19T05:00:04+5:30

खुमराज रहांगडाले हे रविवारी (दि. १३) सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान मुलीची प्रकृती बरी नसल्याने औषध आणण्यासाठी दुचाकीने (क्र. एमएच ३५-एआर ७९१९) खोडशिवनी येथे जात असता खोडशिवणी ते म्हसवानी मार्गावर रस्त्याच्या कडेला ते जखमी अवस्थेत मिळून आले होते व त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.  प्रकरणी त्यांच्या पुतण्या विजय डेकनलाल रहांगडाले (रा.म्हसवानी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

Murder, not an accident at Mhaswani | म्हसवानी येथील अपघात नसून खून

म्हसवानी येथील अपघात नसून खून

Next
ठळक मुद्देपाच आरोपींना केली अटक : डुग्गीपार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  मुलीची प्रकृती बरी नसल्याने औषध आणण्यासाठी गेलेला इसम जखमी अवस्थेत आढळून येऊन त्यातच मृत्यू झाल्याने अगोदर हा अपघात वाटत होता. मात्र तो अपघात नसून खून असल्याचे मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत उघडकीस आले असून, डुग्गीपार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. रविवारी (दि. १३) घडलेल्या या प्रकरणातील मृताचे नाव खुमराज बळीराम रहांगडाले (५५, रा.म्हसवानी) असे आहे.
खुमराज रहांगडाले हे रविवारी (दि. १३) सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान मुलीची प्रकृती बरी नसल्याने औषध आणण्यासाठी दुचाकीने (क्र. एमएच ३५-एआर ७९१९) खोडशिवनी येथे जात असता खोडशिवणी ते म्हसवानी मार्गावर रस्त्याच्या कडेला ते जखमी अवस्थेत मिळून आले होते व त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.  प्रकरणी त्यांच्या पुतण्या विजय डेकनलाल रहांगडाले (रा.म्हसवानी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र सोमवारी (दि. १४) उत्तरीय तपासणी अहवालात त्यांच्या डोक्यावर व कानाजवळ असलेल्या जखमा धारदार हत्याराच्या असल्याचे सांगितले. यावरून मृताचा भाऊ उदेलाल ब‌ळीराम रहांगडाले (५२,रा. म्हसवानी) यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता, तर पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून डुग्गीपार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने पथक गठित करून प्रकरणाचा तपास सुरू केला. यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीवरून, योगेश फागुलाल बोपचे (२७, ) याला ताब्यात घेतले असता त्याने मित्रांच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले. त्यानुसार, पमेश पन्नालाल पटले व विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले, तर डुग्गीपार पोलिसांनी अंशुमन गोविंदा निमावत (२३, रा.बसंतनगर, गोंदिया) याला भंडारा येथील बसस्थानक येथून व गणेश बंडू येटरे (२०,रा. बसंतनगर, गोंदिया) याला गोंदियातून ताब्यात घेतले.

 

Web Title: Murder, not an accident at Mhaswani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app