शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पुजारीटोलातून सोडले गरजेपेक्षा अधिक पाणी

By admin | Updated: October 15, 2015 02:11 IST

बाघ नदी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पुजारीटोला, कालीसराड आणि सिरपूर या तीन धरणांचे पाणी शेतकऱ्यांना धानाच्या पिकाकरिता दिल्या जाते.

बिजेपार : बाघ नदी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पुजारीटोला, कालीसराड आणि सिरपूर या तीन धरणांचे पाणी शेतकऱ्यांना धानाच्या पिकाकरिता दिल्या जाते. खरिपातील भारी धानाकरिता हे पाणी अजूनही सोडले जात असले तरी हलक्या धानासाठी ते मारक ठरत आहे.पुजारीटोला धरणातून दोन कालवे दिल्या गेले आहेत. उजव्या कालव्यातून मध्य प्रदेशातील लांजीपर्यंत पाणी दिल्या जातो तर डाव्या कालव्याचे पाणी गोंदिया तालुक्यातील रावणवाडीपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी सोडल्या जाते. हे तिन्ही धरण महाराष्ट्र राज्य व मध्यप्रदेश राज्य यांच्या संयुक्त परियोजनेने बनलेले आहेत. सध्या धानाच्या वाणाला पाणी दिल्या जात आहे. परंतु एकीकडे हलक्या प्रतीचा धान आता कापण्यास सुरुवात झाली आहे तर पुजारीटोला धरणाच्या कालव्यातून सोडल्या जाणाऱ्या अधिकच्या पाण्यामुळे काही शेतकरी त्रस्त झाले आहेत. पं.स. सदस्य दिलीप वाघमारे हे आपल्या क्षेत्राचा दौरा करताना संबंधित बाब लक्षात आल्याचे सांगितले. कोटरा-हलबीटोला, लोहारा, गोर्रे, शेरपार, या गावातील काही शेतकरी शेतातून अतिरिक्त प्रमाणात पाणी साचून असल्यामुळे धानाला सुखण्याकरिता वातावरणच मिळत नाही, असे लोहारा येथील प्रगतिशिल शेतकरी युवराज नारायण कटरे यांनी सांगितले. त्यांनी असेही सुचित केले आहे की, जर मध्यप्रदेशातील शेवटच्या शेतकऱ्यांना पाणीच लागत असेल तर नहराची पाण्याची पातळी कमी करुन द्यावी. पाणी जर शेतकऱ्यांना हवे नसेल व सतत दोन्ही कालव्यातून पाणी असेच सोडल्यास पाण्याचा अपव्यय होईल व आगामी रबी पिकाचे क्षेत्र सुद्धा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकाऱ्यांनी याची शहनिशा करुन दोन्ही कालव्याचे पाणी त्वरित थांबवावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)