शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण पॉवर हाऊसचे आधुनिकीकरण करा

By admin | Updated: May 16, 2016 02:04 IST

जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात वसलेली नगरपंचायत म्हणजे देवरी. परंतु नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना शासनाकडून नक्षलग्रस्त निधी ...

उपकरणे झाली जीर्ण : पावसाळा सुरू होण्याआधीच वीज खंडितचा त्रासदेवरी : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात वसलेली नगरपंचायत म्हणजे देवरी. परंतु नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना शासनाकडून नक्षलग्रस्त निधी अंतर्गत विशेष अर्थसहाय्य विविध योजनांच्या माध्यमातून करुन सोयीसुविधा पोहोचविण्याचे कार्य शासन करते. परंतु देवरी नगर पंचायत क्षेत्रात सध्या सर्वात मोठी समस्या म्हणजे कुठलेही मोठे कारण नसताना वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा त्रास. महावितरणचे पॉवर हाऊस आधुनिक केल्याशिवाय या त्रासातून देवरीवासीयांची मुक्तता होणार नाही.हा त्रास नागरिकांना सतत दोन तीन वर्षापासून सुरू आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कितीतरी वर्षांपासून जी उपकरण लावली आहेत ती जीर्ण होत असल्याने त्याच्या व्यवस्थापनात वारंवार अडचण निर्माण होत आहेत, असे महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. या नागरिकांच्या प्रमुख अडचणींकडे कुणाचे लक्ष नसताना सतत समाजाच्या छोट्या व प्रमुख अडचणींकडे ज्यांचे प्रामुख्याने लक्ष असले असे देवरी येथील सामाजिक कार्यकर्ते व नगर पंचायत सदस्य यादोराव पंचमवार व भाजयुमोचे तालुका महामंत्री कुलदीप लांजेवार यांनी जनतेची ही समस्या आ. संजय पुराम यांच्याकडे मांडली. आ. पुराम यांनी जनतेची ही समस्या समजून त्वरित राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देवरी पॉवर हाऊसचे आधुनिकीकरण करण्यात यावे, येथील विद्युत पुरवठा ३३ केव्ही वॅटवरून ६६ केव्ही वॅट करावा, येथे असलेली ५ एम.व्ही.ए. एक्सएमईआर हे ट्रान्सफार्मर १० एम.व्ही.ए. एक्सएमईआर करण्यात यावी व संपूर्णत: आधुनिकीकरण करुन व्यवस्थित विद्युत पुरवठा कसा होईल यासंबंधी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावे, असे निवेदन ऊर्जामंत्र्यांच्या दालनात सादर केले.परंतु अजूनपर्यंत संबंधित कार्यालयाला तशा सूचना प्राप्त झाल्या नाहीत. ऊर्जा खात्याच्या बाबतीत सदैव तत्पर असलेले ऊर्जामंत्री देवरी पॉवर हाऊसचे आधुनिकीकरण केव्हा करतात व पावसाळा सुरू होण्याआधी नकळत वारंवार विद्युत खंडित होण्यामुळे होणारा देवरी नगरवासीयांचा त्रास केव्हा दूर करतात, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. जर या पॉवरहाऊसचे आधुनिकीकरण झाले नाही दिवसेंदिवस जीर्ण होत असलेली ही उपकरणे जळून भस्म होतील व देवरी पॉवरहाऊस म्हणून जेवढ्या क्षेत्रात विद्युत पुरवठा होतो तेवढ्या क्षेत्रातील जनतेला अंधारात रहावे लागेल. (प्रतिनिधी)