शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या बसमध्ये चालक वापरतात मोबाईल

By admin | Updated: December 27, 2015 02:09 IST

सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या प्रवासाकडे पाहिले जाते. परंतु हल्लीच्या काळात एसटीचा प्रवास सोयीस्कर राहिलेला नाही.

गोंदिया : सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या प्रवासाकडे पाहिले जाते. परंतु हल्लीच्या काळात एसटीचा प्रवास सोयीस्कर राहिलेला नाही. एसटीचे चालक वाहन चालविताना चक्क मोबाईलचा वापर करीत असल्याचे चित्र अनेक बसेसमध्ये दिसून येते. धावत्या बसमध्येही मोबाईलचा वापर होत असल्याने प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.बसमधील चालक व वाहकांना प्रवासादरम्यान मोबाईल वापरण्यास बंदी आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात धावणाऱ्या अनेक बसेसमध्ये वाहक व चालक मोबाईलचा सर्रास वापर करतात. यामुळे एसटीला तोटाही होतो. शिवाय अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिवहन मंडळाने ७ जानेवारी २०१४ रोजी एक आदेश काढून एसटीच्या चालक व वाहकांनी मोबाईल ठेऊ नये असे सांगितले. मात्र या मोबाईल बंदीचा फज्जा जिल्ह्यातील एसटी वाहन चालक करीत आहेत. मोबाईलवर बोलता-बोलता तोल ढासळला तर शेकडो प्रवाशांना प्राणास मुकावे लागेल. ही स्थिती एसटीच्या वाहन चालकांना माहिती असतानाही एसटीचे चालक चालत्या वाहनातून मोबाईलवर बोलून कारवाई करणाऱ्या पथकाची माहिती एकमेकांना देत असतात. त्यामुळे प्रवाशांकडून पैसे घेऊनही त्यांना तिकीट न देणाऱ्या वाहनचालक व वाहकांना पकडता येत नाही. मोबाईल बंदीचे फर्मान सोडण्यात आले मात्र याचे पालन वाहक- चालक करीत नाही. धावत्या बसमध्ये मोबाईलचा वापर करतात तेव्हा त्या बसमध्ये बसणारे प्रवासी काही वेळासाठी धास्तावलेले असतात. धावत्या बसमध्ये मोबाईलचा वापर करून बसमधील प्रवाश्यांच्या जीवाशी खेळत ठरत आहे. (प्रतिनिधी)