मेडिकल कॉलेजचे बजेट ४०० कोटींपेक्षा जास्त

By Admin | Updated: January 4, 2015 23:14 IST2015-01-04T23:14:57+5:302015-01-04T23:14:57+5:30

गोंदियातील बहुप्रतीक्षित मेडिकल कॉलेजसाठी ४०० कोटी रुपयांचे बजेट बनविण्यात आले आहे. मात्र हे कॉलेज सुरू करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे आता त्या बजेटमध्ये आणखी

The medical college has more than 400 crores | मेडिकल कॉलेजचे बजेट ४०० कोटींपेक्षा जास्त

मेडिकल कॉलेजचे बजेट ४०० कोटींपेक्षा जास्त

गोंदिया : गोंदियातील बहुप्रतीक्षित मेडिकल कॉलेजसाठी ४०० कोटी रुपयांचे बजेट बनविण्यात आले आहे. मात्र हे कॉलेज सुरू करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे आता त्या बजेटमध्ये आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुढील सत्रापासून गोंदियात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. आधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी यासाठी जोर लावून हे महाविद्यालय गोंदियात मंजूर करून आणले होते. मात्र निकषांची पूर्तता करू न शकल्यामुळे मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने तो प्रस्ताव मान्य केला नव्हता. मात्र नंतर सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला. आता भाजप सरकारनेही या मेडिकल कॉलेजसाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
गोंदियातील कुडवा भागात दूध डेअरीच्या समोरील भागातील जागा मेडिकल कॉलेजसाठी मिळाली आहे. त्या ठिकाणी प्रशासकीय इमारतीसह डॉक्टरांचे क्वॉर्टरही राहणार आहेत. याशिवाय गं्रथालय, ६ प्रयोगशाळा राहणार आहेत. याशिवाय याच ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचीही व्यवस्था केली जाणार आहे.
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची चमू नुकतीच गोंदियात आली होती. त्यांनी ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात सुरू केले जाणार आहेत त्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात, बाई गंगाबाई रुग्णालयात आणि कुडवा येथील शासकीय दूध डेअरीसमोरील जागेचे निरीक्षण केले. महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली २५ एकराची जागा कुडवा येथे उपलब्ध झाली असल्याचे सांगितले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The medical college has more than 400 crores