मालगाडीने कटून मायलेकींचा मृत्यू

By Admin | Updated: February 2, 2016 01:35 IST2016-02-02T01:35:55+5:302016-02-02T01:35:55+5:30

सालेकसाकडून गोंदियाकडे येणाऱ्या मालगाडीने कटून मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारच्या दुपारी २.३० वाजतादरम्यान घडली.

Matlikee death by cutting the carriage | मालगाडीने कटून मायलेकींचा मृत्यू

मालगाडीने कटून मायलेकींचा मृत्यू

हळहळ : मंदिराजवळील घटना
गोंदिया : सालेकसाकडून गोंदियाकडे येणाऱ्या मालगाडीने कटून मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारच्या दुपारी २.३० वाजतादरम्यान घडली. मृत पावलेल्या मायलेकी सालेकसा तालुक्याच्या दरबडा येथील आहेत.
सालेकसाच्या गडमाता येथे ग्रामीण रूग्णालय सालेकसाकडून दंत रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरात भाग घेण्यासाठी मायलेकी सोना लेखचंद तांडेकर (४५) व उषा लेखचंद तांडेकर (२२) गेल्या होत्या. सदर घटना गडमाता मंदिराजवळच घडली.
या दंतरोग तपासणी शिबिरात तपासणी करून घरी परतत असताना सोमवारच्या दुपारी २.३० वाजतादरम्यान हा अपघात झाला. रेल्वे रूळावरून त्या येत असताना एका गाडीचा आवाज आला. त्यानंतर दोघीही घाबरून खाली उतरल्या. ती गाडी गेल्यावर आपल्या घरी जाण्यासाठी त्या रूळ ओलांडत असताना दुसऱ्या बाजूने येणाऱ्या गाडीचा आवाज त्यांना आला नाही. परिणामी ही घटना घडली. घटनास्थळावरच मायलेकींचा मृत्यू झाला.
या घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Matlikee death by cutting the carriage