शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

Maharashtra Election 2019 ; दिग्गज दाखल करणार उमेदवारी अर्ज आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 6:00 AM

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आघाडीचे उमेदवार मनोहर चंद्रिकापूरे सकाळी १० वाजता अर्जुनी मोरगाव येथील प्रसन्ना सभागृहातून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी त्यांच्यासोबत खा.प्रफुल्ल पटेल, माजी आ.राजेंद्र जैन तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहतील.

ठळक मुद्देनिवडणूक विभागाचे नियोजन : प्रचाराला होणार शनिवारपासून सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस असून सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे चारही मतदारसंघात उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या शक्ती प्रदर्शनामुळे उपविभागीय कार्यालयासमोर गर्दी होणार आहे.२७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र युती आणि आघाडीच्या उमेदवारांच्या याद्या उशीरा जाहीर झाल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांना उशीरा झाला. त्यातच सुट्या आल्या होत्या त्यामुळे सुध्दा या प्रक्रियेला थोडा विलंब झाला होता. त्यातच शुक्रवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटचा दिवस असल्याने सर्व राजकीय पक्षांसह इतर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली. अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राजकुमार बडोले हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. सकाळी १० वाजता अर्जुनी मोरगाव येथील दुर्गा चौकातून त्यांच्या रॅलीला सुरूवात होणार असून यानंतर ते उपविभागीय कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आ.केशव मानकर, खुशाल बोपचे, नेतराम कटरे उपस्थित राहणार आहेत. गोंदिया विधानसभा क्षेत्राचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल शहरातील सर्कस मैदान येथून सकाळी १०.३० वाजता रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.या वेळी त्यांच्यासह पालकमंत्री परिणय फुके, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, गोंदिया विधानसभेचे प्रभारी खोमेश रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, भाजप जिल्हा महिलाध्यक्ष भावना कदम, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, माजी आ.रमेश कुथे उपस्थित राहणार आहेत. तर तिरोडा विधानसभेचे भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले सकाळी ११ वाजता मातोश्री लॉन येथून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आघाडीचे उमेदवार मनोहर चंद्रिकापूरे सकाळी १० वाजता अर्जुनी मोरगाव येथील प्रसन्ना सभागृहातून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी त्यांच्यासोबत खा.प्रफुल्ल पटेल, माजी आ.राजेंद्र जैन तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहतील. तर आमगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार सहषराम कोरोटे हे दुपारी १ वाजता देवरी येथील धुकेश्वरी मंदिर येथून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.या वेळी त्यांच्यासोबत खा.प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री भरत बहेकार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी उपस्थित राहतील. गोंदिया मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून अमर वऱ्हाडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून ते शुक्रवारी रॅली काढून काँग्रेस उमेदवारी अर्ज दाखल करतील. या वेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहतील.निवडणूक विभागाची धावपळशुक्रवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यातच सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे निवडणूक आणि पोलीस विभागाची सुध्दा धावपळ होणार आहे. त्यामुळे वेळेवर कुठली धांदल होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे.अमर वऱ्हाडे यांना काँग्रेसची उमेदवारीगोंदिया विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचा उमेदवार कोण याची चर्चा मागील तीन चार दिवसांपासून होती. मात्र गुरूवारी रात्री काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत अमर वऱ्हाडे यांना गोंदिया विधानसभेची उमेदवारी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे यावरुन सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्ण विराम लागला आहे.

टॅग्स :gondiya-acगोंडिया