शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

महादेवाच्या गजराने दुमदुमले प्रतापगड

By admin | Updated: February 18, 2015 01:37 IST

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या प्रतापगड या तिर्थस्थळावर महाशिवरात्री पर्वानिमित्त दोन लाखावर भाविकांनी भोलाशंकर व मुस्लिम बांधवानी ख्वाजा उस्मान गणी हारूनी बाबांचे दर्शन घेतले.

अर्जुनी-मोरगाव : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या प्रतापगड या तिर्थस्थळावर महाशिवरात्री पर्वानिमित्त दोन लाखावर भाविकांनी भोलाशंकर व मुस्लिम बांधवानी ख्वाजा उस्मान गणी हारूनी बाबांचे दर्शन घेतले. ‘हर बोला... हर हर महादेव...’ असा गजर करीत भाविकांनी दर्शनासाठी उन्हातान्हात लांबच लांब रांगा लावल्या होत्या.मंगळवारला (१७) प्रतापगडावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोेले, खा.नाना पटोले, आ.राजेंद्र जैन व मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी हजेरी लावून प्रतापगडावर महादेवाचे दर्शन घेतले. याशिवाय महाप्रसाद वितरणातही सहभाग घेतला.हातात त्रिशूल व मुखात महादेवा जातो गा.... असे भक्तीगीत गात येथे पूर्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांचे जत्थे येथे सोमवारच्या रात्रीपासूनच डेरेदाखल झाले. भल्या पहाटेपासून भक्तजणांच्या गर्दीने प्रतापगड फुलले होते. सकाळी ११ वाजतानंतर भाविकांनी प्रचंड गर्दी केली. वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध असल्याने भाविकांचे आवागमन सायंकाळपर्यंत सुरूच होते. माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या निधनामुळे यावर्षी खा.प्रफुल्ल पटेल यांनी आपला पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केला असला तरी त्यांचे प्रतिनिधी म्हणून आ.राजेंद्र जैन व वर्षा पटेल येथे हेलिकॉप्टरने दाखल झाले. नाना पटोले व मित्र परिवार तसेच ना.राजकुमार बडोले व मित्र परिवाराच्या वतीने संयुक्तरित्या, याशिवाय स्व.मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या वतीने भक्तजणांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते दरवर्षी येथे भाविकांची गर्दी वाढतच असते. लगतच्या अनेक जिल्ह्यातील भाविक येथे महाशिवरात्रीला दर्शनासाठी येतात. त्यामुळे सोयीसुविधा वाढविण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)जनतेच्या मांगल्याचे मागणे- पटेलमनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी प्रतापगडला भेट देऊन भगवान शिवाच्या चरणी माथा टेकून आपल्या परिसरातील जनतेच्या मागल्यांचे मागणे घातले. यावेळी त्यांचासमवेत आ. राजेंद्र जैन उपस्थित होते. त्यांनी पायथ्यापासून महादेवाच्या मंदिरापर्यंतचे सात किमी अंतर शिवभक्तांसोबत पायी चालत त्यांनी पूर्ण केले. वाटेत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून आलेल्या भक्तांशी हितगुज करीत वर्षाताई महादेवाच्या चरणी पोहोचल्या. मनोहरभाई पटेल अकादमीच्या वतीने शिवभक्तांसाठी आयोजित महाप्रसाद मंडपात त्यांनी भेट दिली. आपल्या हाताने अनेक भक्तांना प्रसादाचे वितरण केल्यानंतर त्यांनी स्वत: महाप्रसाद ग्रहण केला. यावेळी देवेंद्रनाथ चौबे, नामदेव डोंगरवार, बंडू भेंडारकर, राजू एन.जैन यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाचा चोख बंदोबस्तपोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वच मार्गावर गावाच्या सीमेबाहेर सुमारे २ ते ३ किमी अंतरावर वाहने थांबविण्यात आल्याने भाविकांची थोडी गैरसोय झाली. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी हा चोख बंदोबस्त पाळला होता. आरोग्य विभागाच्या वतीनेही भाविकांच्या सुविधेसाठी ७ ठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गुज्जनवार यांच्या देखरेखीखाली आरोग्य तपासणीचे केंद्र उघडण्यात आले होते. भक्तजणांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून ठिकठिकाणी प्याऊ उघडण्यात आले होते. या पहाडावर तालुका प्रशासनाच्या वतीने दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. पालकमंत्र्यांनी घेतले आवरते खा.नाना पटोले व ना.राजकुमार बडोले मित्र परिवारातर्फे दरवर्षी येथे महाप्रसादाचे वितरण केले जाते. ते महाशिवरात्रीच्या दिवशी येथे आवर्जून उपस्थित राहतात. वर्षभरापूर्वी ना.बडोले हे पाच वर्षपर्यंत या विभागाचे आमदार होते. त्यावेळी ते दिवसभर महाप्रसादाच्या शामियानात लोकांच्या भेटी घेत असत, मात्र यावेळी ते दुपारी येथे दाखल झाले. पहाडीवर चढून त्यांनी दर्शन घेतले. अर्धा तास महाप्रसाद शामियानात बसले व नंतर निघून गेले.मुस्लिम बांधवांची गर्दीमुस्लीेम बांधवांनी ख्वाजा उस्मान गणी हारूनी यांचे दर्ग्यावर दर्शनासाठी रिघ लावली होती. महाशिवरात्रीचे दिवशी काही हिंदू बांधव दर्ग्यावर तर मुस्लीम बांधव महादेवाचे दर्शन घेत असल्याचे दृष्य येथे पहायला मिळते. इतिहासाचे अभ्यासक तथा हौसी लोक महाशिवरात्री पर्वावर किल्ल्यावर चढून या ऐतिहासिक पुराव्यांची पाहणी करतात. एरवी महादेव पहाडी व किल्याची पाहणी करण्यासाठी अगदी तुरळक भक्तगण जातात. महादेवा नवसाला पावदेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्तगण अनेक क्लृप्त्या लढवितात. नवस कबूल करतात. असाच प्रकार डोंगरवार खजरी येथील पुष्पा खोटेले व रेखा खोटेले यांनी कबून केला. नवस फेडण्यासाठी त्या १८ फेब्रुवारी रोजी डोंगरगाव येथून सकाळी १० वाजता पायदळ निघाल्या. त्यांनी ५० किमीचा प्रवास २८ तासात पूर्ण केला व त्या प्रतापगड येथे मंगळवारला दुपारी २.३० वाजता पोहचल्या. त्या पूर्णपणे थकल्या असल्या तरी नवस फेडल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते. या दोन्ही महिलांच्या धाडसाचे येथे कौतुक केले जात होते.