शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे १८ सदस्य असून अध्यक्षही त्यांच्याच आहे. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सात, कॉँग्रेसचे नऊ व शहर परिवर्तन आघाडीचे आठ सदस्य आहेत. या आघाडीत पाच सदस्य बहुजन समाज पक्षाचे, दोन सदस्य शिवसेनेचे तर एक सदस्य अपक्ष आहे.

ठळक मुद्देआघाडीचा गटनेता ठरणार : गटनेत्यासाठी आज सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अवघ्या ३ दिवसांवर आलेल्या नगर परिषद विषय समिती सभापती निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. नगर परिषदेत सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता असली तरी त्यांच्यासाठी ही निवडणूक एवढी सोपी ठरणारी दिसत नाही. त्यात शहर परिवर्तन आघाडीच्या गटनेत्याला घेऊन बुधवारी (दि.१२) जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी आहे. यामुळे सर्वांच्या नजरा त्यांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. त्यानुसार पुढे काय समीकरण तयार होतात त्यावरच ही निवडणूक अवलंबून राहणार आहे.नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे १८ सदस्य असून अध्यक्षही त्यांच्याच आहे. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सात, कॉँग्रेसचे नऊ व शहर परिवर्तन आघाडीचे आठ सदस्य आहेत. या आघाडीत पाच सदस्य बहुजन समाज पक्षाचे, दोन सदस्य शिवसेनेचे तर एक सदस्य अपक्ष आहे.नगर परिषदेतील सदस्य बघता ११ सदस्यांची विषय समिती तयार होते. यात सदस्य संख्यानिहाय भाजपचे पाच तर राष्ट्रवादी, कॉँग्रेस व आघाडीचे प्रत्येकी दोन सदस्य असतात. विशेष म्हणजे, आघाडीतील गटनेतासह तीन सदस्य भाजप समर्थक असल्यामुळे भाजपची सदस्य आठ होत असून त्यांचे सभापती निवडले जात आहे.यंदा मात्र ही बाब हेरून आठ सदस्य असलेल्या आघाडीतील बहुजन समाज पक्षाच्या पाच सदस्यांनी बहुमताने ललीता यादव यांना गटनेता निवडले असून तसे पत्र जिल्हाधिकाºयांनाही दिले आहे. गटनेता निवडीच्या विषयाला घेऊन जिल्हाधिकाºयांनी बुधवारी (दि.१२) सुनावणी ठेवली आहे.यात गटनेतापदी ललीता यादव वैध ठरल्यास शनिवारी (दि.१५) होणाºया नगर परिषद सभापतींच्या निवडणुकीचे चित्रच बदलण्याची शक्यता आहे. यामुळेच सर्वांच्या नजरा आता जिल्हाधिकाºयांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.अशा समीकरणाची शक्यतासध्या नगर परिषदेच्या विषय समित्यांमध्ये भाजपचे पाच सदस्य असून राष्ट्रवादीचे दोन, कॉँग्रेसचे दोन व आघाडीचे दोन सदस्य आहेत. विशेष म्हणजे, आघाडीचे गटनेता राजकुमार कुथे असल्याने ते त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन सदस्यांची नावे विषय समितीत पाठविणार असल्याची माहिती आहे. यामुळे भाजपची सदस्य संख्या सात होत असून त्यांचेच सभापती निवडून येतात. यंदा मात्र आघाडीच्या गटनेता म्हणून ललीता यादव यांना अधिकार मिळाल्यास त्यातच राष्ट्रवादी व कॉँग्रेस आघाडीच्या सोबत राहिल्यास त्यांची सदस्य संख्या सहा होणार असून भाजपला मात्र खुर्चीपासून दूर रहावे लागणार आहे. या समीकरणाला बघता सर्वच पक्षांमध्ये वातावरण तापलेले दिसत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका