शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

त्या बिबट्याची करंट लावून केली शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 05:00 IST

आपल्या साथीदारांसह बिबट्याची शिकार करून त्याचे चामडे व अवयवांची परस्पर विल्हेवाट लावली. अशी माहिती सूत्रांनी दिली. बिबट्याचे कातडे विकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपींना नवेगावबांध  पोलिसांनी  दिनांक १८ नोव्हेंबरला रात्री अटक केली होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक या कार्यालयाकडे सोपविला आहे. या तिन्ही  आरोपींवर वन्य प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देबिबट कातडे व शिकार प्रकरण : पुन्हा पाच आरोपींना अटक, तपासाला गती

  लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : बिबट्याचे कातडे विकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपींना १८ नोव्हेंबरच्या रात्री नवेगावबांध पोलिसांनी अटक केली होती. यातील मुख्य आरोपी देविदास दादू मरस्कोल्हे वन काेठडी दरम्यान विद्युत प्रवाहाने बिबट्याची शिकार केल्याची कबुली तपासात दिली आहे. तसेच या प्रकरणात एकूण आठ आरोपींचा समावेश असून इतर पाच आरोपींना मंगळवारी (दि.२४) अटक करण्यात आली.१९ नोव्हेंबरला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्या न्यायालयात या तिघांना हजर करून २५ नोव्हेंबरपर्यंत वन कोठडी मागण्यात आली होती. वन विभागाच्या तपासात पुन्हा पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या पाचआरोपींमध्ये गोवर्धन सुरेश सिंधीमेश्राम (३०) राहणार सानगाव, महेंद्र काशिराम मोहनकर (२७) राहणार सानगाव, रामाजी रूपराम खेडकर (४५) राहणार सानगडी, वसंता शालिकराम खेडकर (५०) राहणार झाडगाव व महेश धनपाल घरडे (४०) राहणार झांजिया यांचा समावेश आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी देविदास मरस्कोल्हे हा आहे. याने आपल्या साथीदारांसह बिबट्याची शिकार करून त्याचे चामडे व अवयवांची परस्पर विल्हेवाट लावली. अशी माहिती सूत्रांनी दिली. बिबट्याचे कातडे विकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपींना नवेगावबांध  पोलिसांनी  दिनांक १८ नोव्हेंबरला रात्री अटक केली होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक या कार्यालयाकडे सोपविला आहे. या तिन्ही  आरोपींवर वन्य प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना मुद्देमालासह  ताब्यात घेऊन सहाय्यक वनसंरक्षक व प्रकाषष्ठ निष्कासन अधिकारी दादा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधिन वनाधिकारी अग्रिम सैनी, वनपरिक्षेत्राधिकारी रोशन दोनोडे, वनरक्षक मिथून चव्हाण, विशाल बोराडे पुढील चौकशी करीत आहेत.

टॅग्स :leopardबिबट्या