पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅनची सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:01:01+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा म्हणून सॅनिटायझरयुक्त पोलीस वाहन सज्ज करण्यात आले आहे.

Launch of a sanitizer van for police | पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅनची सुरूवात

पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅनची सुरूवात

Next
ठळक मुद्देदर चार तासाने सॅनिटायजर :कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशात आणि राज्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशान्वये २३ मार्च अन्वये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा म्हणून सॅनिटायझरयुक्त पोलीस वाहन सज्ज करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व आंतरराज्य व इतर जिल्ह्यांची सीमा आवागमन करीता पूर्णत: बंद करण्यात आली आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनला महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी पाईंट लावण्यात आहेत. पोलीस स्टेशन गोंदिया शहरातंर्गत जयस्तंभ चौक गोंदिया, नेहरू चौक, आदर्श सिंधी स्कूल सावराटोली गोंदिया असे ३ ठिकाणी, पोलीस स्टेशन रामनगर अंतर्गत कुडवा नाका, पाल चौक, विशाल मेगामार्ट असे ३ ठिकाणी, पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण अंतर्गत कारंजा टी पार्इंट, फुलचूर नाका, पतंगा चेकपोस्ट, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत देव्हाडा, आंतरराज्यीय चेकपोस्ट बोंडराणी, पोलीस स्टेशन कोरणीघाट, पोलीस स्टेशन तिरोडा अंतर्गत आंतरजिल्हा अंतर्गत आंतरराज्य लांजी रोड माल्ही, आंतरजिल्हा घाटटेमणी अशा २ ठिकाणी, पोलीस स्टेशन सालेकसा अंतर्गत भातगिरणी चौक, लांजी रोड साखरीटोला असे २ ठिकाणी, पोलीस स्टेशन गोरेगाव अंतर्गत बस स्टॉप चौक, पोस्ट देवरी अंतर्गत आंतरराज्य चेकपोस्ट सिरपूर, पोलीस स्टेशन डुग्गीपार अंतर्गत आंतरजिल्हा सौंदड बॉर्डर,पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव आंतरजिल्हा चेक पोस्ट गौरनगर, पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत आंतरजिल्हा चेक पोस्ट केशोरी टी पाईंट व पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे टी पार्इंट येथे नाकाबंदी लावण्यात आली आहे. प्रत्येक येणाºया-जाणाºया वाहनांची व व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त आढळून येणारे वाहन व व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात लावण्यात आलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता खबरदारी म्हणून बंदोबस्तावर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी गोंदिया पोलीस दलामार्फत ८ एप्रिल रोजी सॅनिटायझर व्हॅन सुरू करण्यात आली आहे. सर्व नाकाबंदी पाईंटवर जाऊन दर ४ तासांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सॅनिटायझ करणार आहेत. सॅनिटायझर व्हॅनमुळे निश्चितच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना विषाणूपासून बचाव करण्यास मदत होईल.

नागरिकांनो आदेशाचे पालन करा
गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आदेशाचे पालन करा असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात कलम १४४ लागू असल्याने व दिनांक १४ एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन सुरू असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर जावू नये त्यांनी घरातच राहावे. वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, असे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी म्हटले आहे.

Web Title: Launch of a sanitizer van for police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.