शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट कोविड रूग्णांशी आरोग्य विभागाच्या पर्सनल टच अभाव कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 05:00 IST

अशा रूग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतरही उपचाराची गरज असून त्यांच्यावर आरोग्य विभागाची नजर असणे अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यात पोस्ट कोविड रूग्णांना काही त्रास जाणवत असल्यास हे जाणून घेण्यासाठी काही सुविधा नाही. शिवाय त्यांची विचारपूस करण्याचीही सोय नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १२९१८ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून एवढ्या रूग्णांवर नजर ठेवणे शक्य नाही.

ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालयात समुपदेशनाची सोय: संपर्क साधला जात नाही

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता बाधितांची संख्या १३३९९ पर्यंत पोहचली आहे. तर यातील १२९१८ रूग्ण या आजारावर मात करून आपापल्या घरी पोहचले आहेत. मात्र कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही रूग्णांमध्ये अन्य काही त्रास जाणवत असून अशा रूग्णांना वैद्यकीय भाषेत पोस्ट कोविड रूग्ण म्हटले जाते.  अशा रूग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतरही उपचाराची गरज असून त्यांच्यावर आरोग्य विभागाची नजर असणे अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यात पोस्ट कोविड रूग्णांना काही त्रास जाणवत असल्यास हे जाणून घेण्यासाठी काही सुविधा नाही. शिवाय त्यांची विचारपूस करण्याचीही सोय नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १२९१८ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून एवढ्या रूग्णांवर नजर ठेवणे शक्य नाही. अशात त्यांना  काही त्रास जाणवत असल्यास त्यांनीच वैद्यकीय महाविद्यालयातील ओपीडीत जावून चाचणी करणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, यासाठी महाविद्यालयात मनोरोग विभागातून समुपदेशन केले जात आहे. शिवाय फिजियोथेरपी विभाग तयार करण्यात आला असून रूग्णांना काय काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले जात आहे. 

काय काळजी घेतली जातेपोस्ट कोविड रूग्णांसाठी वैद्यकीय महाविद्यालयात मनोरोग समुपदेश विभाग तयार करण्यात आला आहे. तसेच फिजियोथेरपीसाठी विभाग तयार करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या रूग्णांचा त्यांची समस्या जाणून त्यानुसार उपचार ठरविला जातो. एवढेच नव्हे तर त्यांना कोरोनानंतरही काय काळजी घ्यावी यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. 

रूग्णांनी संपर्क साधावाकोरोनातून बरे झाल्यानंतर रूग्णांना काही त्रास जाणवत असल्यास त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील ओपीडीमध्ये यावे. अशा रूग्णांसाठी समुपदेशन केंद्रासह फिजियोथेरपी विभाग तयार करण्यात आला आहे. तज्ज्ञ अशा रूग्णांना मार्गदर्शन करीत आहेत. डॉ. नरेश तिरपुडे अधिष्ष्ठाता, शास.वैद्यकीय महाविद्यालय 

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या