शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:19 IST

ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट गोरेगाव : जागतिकीकरणामुळे विविध प्रकारचे आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक ...

ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट

गोरेगाव : जागतिकीकरणामुळे विविध प्रकारचे आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, पारंपरिक झाडू व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत. हाच प्रकार अन्य व्यवसायांबाबत दिसून येत असून, ग्रामीण कारागीरसुद्धा अडचणीत आहेत.

महिनाभरात डांबरी रस्त्यांवर खड्डे

आमगाव : परिसरात निम्म्याहून अधिक रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत डांबरीकरण करण्यात आले आहेत. बहुतांश डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवर महिनाभरात खड्डे पडले आहेत. या रस्त्यांच्या खड्ड्यांत पॅचेस मारले जात आहेत. दरम्यान अल्प कालावधीत रस्त्यावर खड्डे पडल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. या संपूर्ण रस्ते बांधकामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

रेतीमुळे घरकुलाचे स्वप्न अधांतरीच

सालेकसा : पर्यावरणाचे कारण सांगत शासनाने रेतीघाट लिलाव केलेले नाहीत. असे असतानाही याच शासनाने रस्ता तथा इमारत बांधकाम, घरकूल बांधकाम मंजूर केले आहे. रेतीला परवानगीच नाही, तर ही कामे होणार तरी कशी, असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे. अशातच काही रेती तस्कर चांगलाच फायदा घेत आहेत. सर्रास रेतीची चोरी करून वाहतूक सुरू आहे. अव्वाच्या सव्वा दराने रेतीविक्री होत असल्याने सर्वसामान्यांना बांधकाम कसे करावे, असा प्रश्न पडला आहे.

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

नवेगाव बांध : वन्य हिंस्र प्राण्यांनी शेतशिवार व गाव परिसरात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांना जखमी किंवा ठार मारणे सुरू केले आहे. हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता

देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे वाहन बाहेर काढणे कठीण होत आहे.

रस्त्यावरील बांधकाम साहित्याने अपघात

गोंदिया : बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकले जाते. रेती, गिट्टी, लोखंड रस्त्यावर पडून राहत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. रेतीवरून अनेक वाहने घसरून पडत आहेत.

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी

देवरी : परिसरातील शेतशिवारात अनेक मोकाट कुत्री असून, ती एकटी महिला किंवा पुरुष पाहून हल्ला करतात. पाळीव जनावरांनाही ती जखमी करीत आहेत.

तंटामुक्त समितीचे तंट्याकडे झाले दुर्लक्ष

तिरोडा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना शासनाने बक्षीस रूपात रक्कम दिली. मात्र, रक्कम मिळाल्यानंतर समित्यांचे तंट्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

पानगाव-सोनपुरी-खेडेपार रस्ता खड्ड्यांत

सोनपुरी : सालेकसा तालुक्यातील पानगाव-सोनपुरी-खेडेपार रस्ता मध्य प्रदेशला जोडणारा एकमेव रस्ता आहे. यंदाच्या संततधार पावसामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

लक्ष लागले आता नुकसानभरपाईकडे

केशोरी : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या परतीच्या पावसाने आणि तुडतुडा, करपा, खोडकिडा या कीडरोगांनी खरीप हंगामातील धानपिकाची नासाडी झाली. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अपकृपेने हिरावून घेतला. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले आणि मदत मिळण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले आहेत. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष आता नुकसानभरपाईकडे लागले आहे.