शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारच्या कामांवर नजर ठेवा

By admin | Updated: March 19, 2017 00:31 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून परिसरात पेयजल व सिंचनासाठी पाणी संग्रहणाचे आमचे लक्ष्य आहे.

अग्रवाल : सोनबिहरी येथे नालाबांध व सभामंडपाचे भूमिपूजन गोंदिया : जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून परिसरात पेयजल व सिंचनासाठी पाणी संग्रहणाचे आमचे लक्ष्य आहे. ज्या गावांत जास्त पाणी टंचाई असते त्या गावांना सर्वप्रथम लाभ दिला जाणार आहे. मात्र जलयुक्त शिवारची कामे दर्जेदार व लोकोपयोगी ठरावी यासाठी नागरिकांनी या कामांवर नजर ठेवावी असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुक्यातील ग्राम सोनबिहरी येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १२ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट नालाबांध तसेच आमदार निधीतून दोन लाख रूपयांच्या सभा मंडपाच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती विमल नागपूर व पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे प्रामुख्याने होत्या. याप्रसंगी नागपूरे यांनी, तालुक्यातील ग्राम मुरदाडा, वडद, पांजरा, कुडवा, मोगर्रा, मुंडीपार खुर्द, छिपीया सहीत जिल्ह्यात २२ आंगणवाडी इमारत बांधकामाला मंजूरी देण्यात आल्याचे सांगीतले. तसेच लवकरच महिला व विद्यार्थिनींना सायकल व गृहिणींना सिलाई मशिन लवकरच वितरीत केल्या जाणार असल्याचेही सांगीतले. हरिणखेडे यांनीही शासनाच्या योजना प्रत्येक गावात पोहचविण्याचे कार्य पंचायत समिती करीत असल्याचे सांगीतले. याप्रसंगी जिल्हा परिषद कॉंग्रेस गटनेता रमेश अंबुले, सदस्य शेखर पटले, भोमराज चुलपार, पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, सदस्य निता पटले, विनीता टेंभरे, सोनबिहरीचे उपसरपंच कृपाल लिल्हारे, झनकारसिंह लिल्हारे, सुंदरलाल लिल्हारे, ग्रामपंचायत सदस्य मिना चौखांद्रे, मिरा नागपूरे, पुष्पा लिल्हारे, तुळशी बोहने, गिरजाशंकर बिरनवार, मनोहर लिल्हारे, रायपूरचे सरपंच ओम रहांगडाले, उपसरपंच डॉ. बिसेन व अन्य उपस्थित होते.