शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

फक्त दोनच तासांची ड्युटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

तिन्ही कार्यालयात १४ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी शाखा अभियंता सह पाच ते सहा कर्मचारी रेल्वेने गोंदियावरून येणे-जाणे करतात. १२.३० वाजता डेमो रेल्वे गाडीने कार्यालयात येतात व दोन तास कार्यालयीन कामकाज आटपून २ वाजताच्या डेमोने निघून जातात. या प्रकाराकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या कार्यालयाशी संबंधित गावातील शेतकऱ्यांना हात हलवत परत जावे लागते किंवा या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. या कार्यालयाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजताची आहे. परंतु हे येणे-जाणे करणारे कर्मचारी रोजच दोन तास कार्यालयात कसेबसे राहतात.

ठळक मुद्देपाटबंधारे उपविभाग व शाखा अभियंता कार्यालय वाऱ्यावर : रेल्वेच्या वेळापत्रकानुसार कामकाज

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथे उपविभागीय पाटबंधारे विभाग व शाखा अभियंत्याची दोन कार्यालये अशी तीन कार्यालये आहेत. यात कार्यरत अधिकारी- कर्मचारी फक्त दोन तास सेवा देतात. उपविभागीय कार्यालय व दोन शाखा अभियंता कार्यालय या ठिकाणी आहे. अधिकारी-कर्मचारी अप-डाऊन करीत असल्याने रेल्वेच्या वेळापत्रकानुसार या कार्यालयांचा कारभार सुरू असल्याची तक्रार युवा कास्तकार संघटनेने केली आहे.तिन्ही कार्यालयात १४ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी शाखा अभियंता सह पाच ते सहा कर्मचारी रेल्वेने गोंदियावरून येणे-जाणे करतात. १२.३० वाजता डेमो रेल्वे गाडीने कार्यालयात येतात व दोन तास कार्यालयीन कामकाज आटपून २ वाजताच्या डेमोने निघून जातात. या प्रकाराकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या कार्यालयाशी संबंधित गावातील शेतकऱ्यांना हात हलवत परत जावे लागते किंवा या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. या कार्यालयाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजताची आहे. परंतु हे येणे-जाणे करणारे कर्मचारी रोजच दोन तास कार्यालयात कसेबसे राहतात. दोन तास कार्यालयात राहून पगार मात्र पूर्ण महिन्याचा घेतात. असे उपविभागीय अभियंत्यांना केलेल्या तक् ारीत नमूद आहे.प्रतिनिधीने कार्यालयात फेरफटका मारला असता १४ पैकी केवळ पाच कर्मचारी कार्यालयात उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. राजोली, भरनोली पासून, नवेगावबांध परिसरातील शेतकरीही दाखले घेण्यासाठी किंवा अन्य शेतीविषयक कामांसाठी या कार्यालयात येत असतात. मात्र कार्यालयात आल्यावर, कार्यालयातील शाखा अभियंतासह कर्मचारी शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडतच नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांसह पाटबंधारे कार्यालय वाऱ्यावर आहे. स्थानिक मुख्यालयी राहत असलेले कर्मचारी पूर्णवेळ या कार्यालयात दिसतात. या प्रकाराला अधिकाऱ्यांची कृपादृष्टी असल्याचे शेतकरी बोलत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून या प्रकारावर आळा घालून, पूर्ण वेळ कर्मचारी कार्यालयात कसे राहतील याकडे लक्ष देण्याची मागणी युवा कास्तकार संघटनेने केली आहे.कार्यालयात जवळपास २० पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय कामानिमित्त बाहेर जावे लागते.- समीर बंसोड, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, नवेगावबांध

टॅग्स :Employeeकर्मचारी