शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

जवरीच्या बंधारा बांधकामात घोळ

By admin | Updated: May 30, 2014 00:10 IST

लघु पाटबंधारे विभागांतर्गत जवरी येथे नवीन बंधार्‍याचे बांधकाम सुरु आहे. मात्र या कामात बराच घोळ होत आहे. कामावर असलेल्या मजुरांचे शोषण करुन धाक दाखविण्याचा प्रकार सुरु आहे.

कामात अनियमितता : अभियंता व रोजगार सेवकांकडून मजुरांचे शोषणआमगाव : लघु पाटबंधारे विभागांतर्गत जवरी येथे नवीन बंधार्‍याचे बांधकाम सुरु आहे. मात्र या कामात बराच घोळ होत आहे. कामावर असलेल्या मजुरांचे शोषण करुन धाक दाखविण्याचा प्रकार सुरु आहे. यात संबंधित अभियंता व रोजगार सेवकाकडून मोठय़ा प्रमाणात कामात अनियमितता दिसून येत असल्याचे या कामावर जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले.बंधार्‍याच्या बांधकामात तयार करण्यात आलेल्या इस्टीमेटप्रमाणे बांधकाम तयार होत नाही. कामात वापरात येणारी गिट्टी माती मिसळलेली आहे. गिट्टीत चुकीचे प्रमाण आढळून आले आहे. गिट्टी साफ करणारे लोखंडी सिरक नाही. मजूर हातांनी गिट्टी साफ करतात. कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी नाही. साध्या मडक्याचीही व्यवस्था नाही. इस्टिमेंटची प्रत कामावर नाही. मजुरांचे हजेरी रजिस्टर नाही की झोपडी नाही. एकंदरित मजुरांना आवश्यक साधन सामग्री कामाच्या ठिकाणी उपलब्ध नाही. नियमाप्रमाणे या कामाकरिता मजुरांना १६५ रुपये मजुरी देणे आवश्यक आहे. मात्र सर्वांना १५0 रुपये दिले जातात. एका मजुरामागील उर्वरित १५ रुपयाचे वाटप सर्वांना करावे लागते, असे कामावर कार्यरत रोजगार सेवक अशोक गायधने यांनी मजुरांना सांगितले. हा प्रकार सांगताना मजूर घाबरले होते. त्यांना कामावरुन बंद करण्याची धमकी रोजगार सेवकाकडून दिली जात आहे. कामाच्या ठिकाणापासून जवळच रोजगार सेवकाचे शेत आहे. तेथील रबी धानाच्या पीक कापणीकरिता बंधार्‍यावरील चार मजूर लावून काम केल्याचे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले. संबंधित अभियंत्याने लागणारे बांधकाम साहित्य पुरवठय़ाचे काम गोंदियाच्या व्यक्तीला दिले. तो कामावरील मजुरांना काम बंद करण्याची धमकी देतो किंवा एखाद्या गुन्ह्यात अडकविण्याची भाषा वापरतो, असेही मजूर सांगतात. त्याच्या गैरहजेरीत गोंदिया येथील एक मुलगा या कामावर देखरेख ठेवतो. या कामात सिमेंटचे प्रमाण नियमानुसार नाही. रेती ही मातीमि२िँं१्रूँं१त आहे. नियमानुसार लोखंड वापरले जात नाही. तयार करण्यात येत असलेल्या सिमेंट मसाल्यात मोठी तफावत आहे. एकंदर जवरीच्या बंधारा बांधकामात रोजगार सेवक व अभियंत्याने मिळून मजुरांचे शोषण सुरु केले आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्वरित लक्ष द्यावे, अशी मजुरांनी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)