शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकांवर आली लोणचे-पापड विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:00 IST

मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर याचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत गेला. आता दिवसागणिक हजारो रूग्णांची नोंद होत आहे. शासनाने मार्च ते मे महिन्यापर्यंत कडक लॉकडाऊन केले. मात्र त्यानंतर विस्कटलेली अर्थव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी हळूहळू उद्योगधंद्यांना परवानगी दिली. पण अडीच तीन महिने बंद पडून असलेल्या उद्योगांवर अवकळा आल्याने त्यांना कर्मचारी कपात करावी लागली.

ठळक मुद्देपेन-पुस्तक हिरावले : शिक्षकांना शोधावा लागतोय अन्य रोजगार, लॉकडाऊनमुळे हिरावला रोजगार

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनामुळे अवघ्या जगाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. परिणामी उद्योगधंदे व व्यवसाय बंद पडले आहे. तेथे कामावर असलेल्यांवर बेरोजगारीची पाळी आली आहे. यातच शाळा बंद असल्याने शिक्षकांच्या हातचे कामही गेले असून आता त्यांना अन्य रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. अशात येथील काही शिक्षिकांच्या हाती आता पेन-पुस्तक सोडून लोणचे-पापड विकण्याची वेळ आल्याचे बिकट चित्र पाहयला मिळत आहे. एवढेच नव्हे तर अन्य काही व्यवसायात असलेल्यांनाही आपले क्षेत्र बदलावे लागत आहे.मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर याचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत गेला. आता दिवसागणिक हजारो रूग्णांची नोंद होत आहे. शासनाने मार्च ते मे महिन्यापर्यंत कडक लॉकडाऊन केले. मात्र त्यानंतर विस्कटलेली अर्थव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी हळूहळू उद्योगधंद्यांना परवानगी दिली. पण अडीच तीन महिने बंद पडून असलेल्या उद्योगांवर अवकळा आल्याने त्यांना कर्मचारी कपात करावी लागली.विशेष म्हणजे, कोरोनामुळे अद्याप शाळांचा ठोका वाजलेला नसल्याने शिक्षकांना घरीच बसून रहावे लागत आहे.शाळा नाही पगार कोठून अशी स्थिती खासगी शाळेत कार्यरत शिक्षकांची झाली आहे. एकंदर कोरोनामुळे कित्येक चाकरमानी तसेच व्यवसायिकांवर बरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. असे असले तरिही पोटाची खळगी भरण्यासाठी काम तर करावे लागणार असल्याने आता अशा कित्येकांना आपले मूळ काम सोडून अन्य काम करावे लागत आहे. यात शिक्षकांचा भरणा जास्त असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.आजची स्थिती बघता कित्येक शिक्षिकांनी रिकामे बसून होणार नसल्याने घरातच राहून लोणचे, पापड अन्य खाद्यपदार्थांचा व्यवसाय थाटल्याचे बघावयास मिळत आहे. शाळा सुरू नसल्याने संस्था चालकांना पगारासाठी हात वर केले आहे.अशात अन्य कामे करून आपला उदरनिर्वाह करण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. तर शिक्षकही अन्यत्र कामावर जात असून काहींनी आपला छोटामोठा व्यवसाय थाटल्याचे दिसत आहे.कोरोनाच्या या ग्रहणाने भल्याभल्यांची अडचण केली असून कधी पेन व पुस्तक असणारे हात मात्र आज लोणचे, पापड विकण्याच्या किंवा अन्य काही कामांमध्ये गुंतल्याचे दिसत आहे.बिछायत व्यावसायिकांची फसगतकोरोनामुळे कार्यक्रमच काय आता सणासुदींवरही निर्बंध आले आहे.परिणामी बिछायत व्यवसायीकांच्या हाती कामे नाहीत. परिणामी तेही रिकामे बसले असून अडचणीत आले आहेत. हाती पैसा येत नसल्याने कित्येकांनी त्यांच्याकडील कामगारांना सोडले आहे. एवढेच नव्हे तर कित्येक बिछायत व्यवसायीक आता खुद्द आपली ही लाईन सोडून अन्य कामांत उतरल्याचे दिसत आहे. लहान-सहान काही तरी व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करीत असल्याचे चित्र आहे.पानठेल्यांमधून भाज्यांची विक्रीराज्यात तंबाखू बंदी असून तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध आहेत. त्यात थूंकीतूनही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शासनाने पानठेल्यांवर बंदी लावली होती. आता परवानगी दिली असतानाही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करता येणार नाही. विशेष म्हणजे, आज गुटखा शौकीनांची संख्या जास्त असून पानठेलेवाल्यांनाही त्यातच जास्त फायदा आहे. मात्र त्यावरच बंदी असल्याने पानठेलेवाल्यांची अडचण झाली आहे. परिणामी शहरातील कित्येक पानठेलेवाले आता पानठेल्यांतून भाज्यांची विक्री करताना दिसत आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक